अर्थसचिवपदी राजीव महर्षी यांची नियुक्ती
By Admin | Updated: November 12, 2014 01:57 IST2014-11-12T01:57:47+5:302014-11-12T01:57:47+5:30
आर्थिक प्रकरणाचे सचिव राजीव महर्षी यांना मंगळवारी अर्थसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

अर्थसचिवपदी राजीव महर्षी यांची नियुक्ती
नवी दिल्ली : आर्थिक प्रकरणाचे सचिव राजीव महर्षी यांना मंगळवारी अर्थसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. कार्मिक व प्रशिक्षण विभागाने दिलेल्या या आदेशात, मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने 1978 च्या तुकडीतील राजस्थान कॅडरचे भारतीय प्रशासकीय अधिकारी महर्षी यांना अर्थ सचिव म्हणून नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे.
त्यांना मागील महिन्यात आर्थिक प्रकरणांच्या विभागात सचिवपदी नियुक्त करण्यात आले होते. महर्षी हे चार सचिवांमध्ये वरिष्ठ असून ते व्यय, महसूल, अर्थ सेवा व निर्गुतवणूक हा विभाग सांभाळत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)