राजीव गांधींना देशाची श्रद्धांजली

By Admin | Updated: May 22, 2016 02:54 IST2016-05-22T02:54:22+5:302016-05-22T02:54:22+5:30

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या २५व्या पुण्यतिथीनिनिमित्त राजधानी दिल्लीसह देशभरात श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी,

Rajiv Gandhi's tribute to the nation | राजीव गांधींना देशाची श्रद्धांजली

राजीव गांधींना देशाची श्रद्धांजली

नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या २५व्या पुण्यतिथीनिनिमित्त राजधानी दिल्लीसह देशभरात श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, रॉबर्ट वड्रा यांनी वीरभूमी येथे राजीव गांधी यांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, सुशीलकुमार शिंदे, अजय माकन यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या वेळी उपस्थित होते. तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूर येथे २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची निवडणूक सभेदरम्यान हत्या करण्यात आली होती. हा दिवस ‘दहशतवाद विरोधी दिन’ म्हणूनही पाळला जातो.

Web Title: Rajiv Gandhi's tribute to the nation