शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

मोदींचा 'तो' दावा खोटा, नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याने सांगितली INS ची 'विराट'कथा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 15:39 IST

राजीव गांधींच्या हाँगकाँग दौऱ्यावेळीचा हा प्रसंग असून पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीही असाच आयएनएस विराटचा दौरा केला होता.

नवी दिल्ली - निवृत्त व्हाईस अॅडमिरल विनोद पसरिचा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. तसेच गांधी कुटुंबाने आएनएस विक्रांतवर अधिकृत दौऱ्यासाठी हजर होती. मात्र, राजीव गांधींसोबत कुठलेही परदेशी नागरिक किंवा त्यांचे नातेवाईक या दौऱ्यावर हजर नव्हते, असे नौदलाचे व्हाईस अॅडमिरल पसरिचा यांनी म्हटले आहे. पसरिचा यांच्या व्हिडीओचा संदर्भ देत मोदीचा दावा खोटा असल्याचं काँग्रसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले आहे. 

राजीव गांधींच्या हाँगकाँग दौऱ्यावेळीचा हा प्रसंग असून पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीही असाच आयएनएस विराटचा दौरा केला होता. त्यावेळी, त्यांच्यासमवेतही त्यांची मुले आणि नातवंडेही त्यांच्यासमेवत होती, असे पसरिचा यांनी म्हटले आहे. तसेच या दौऱ्यावेळी केवळ सोनिया आणि राजीव गांधींसाठीच हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. राहुल गांधींनी या हेलिकॉप्टरमधून प्रवास केला नसल्याचंही अॅडमिरल पसरिचा यांनी म्हटले आहे. विनोद पसरिचा यांच्या न्यूज चॅनेलवरील व्हिडीओचा संदर्भ देत खेरा यांनी मोदींचे दिल्लीच्या सभेतील वक्तव्य खोटे असून हेच खरं असल्याचे म्हटले आहे. तसेच, विनोद पसरिचा हे त्यावेळी लक्षद्वीप बेटावरील अॅडमिनिस्ट्रेटर होते, असेही खेरा यांनी आपल्या ट्विटरवर नमूद केले आहे.   

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रामलीला मैदानावरुन सभेला संबोधित करताना गांधी परिवारावर हल्लाबोल केला होता. दिल्लीतील सभेत मोदींनी पुन्हा एकदा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचे नाव घेऊन काँग्रेसवर टीका केली. राजीव गांधींनी आयएनएस विराट या युद्धनौकेच्या अनावरणावेळी सासरच्यांचे लाड पुरवले, असा घणाघाती आरोप मोदींनी केला आहे. राजीव गांधीच्या सेवेसाठी नौदलाचा गैरवापर करण्यात आल्याचेही मोदींनी म्हटले.देशाच्या सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आयएनएस विराट युद्धनौका तैनात करण्यात येत होती. मात्र, पिकनिकसाठी जाणाऱ्या गांधी परिवाराच्या स्वागतासाठी ती युद्धनौका देण्यात आली. त्यावेळी, आयएनएस विराट 10 दिवस गांधी परिवार आणि नातेवाईकांना घेऊन पिकनिकसाठी पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला आहे. राजीव गांधींसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी त्यांच्या सासरवाडीचेही लोक हजर होते. विदेशी नागरिकांना भारताच्या युद्धनौकेवरुन फिरवणे हा देशाच्या सुरक्षेशी खेळणं असंच नाही का? असा प्रश्नही मोदींनी विचारला होता. त्यानंतर काँग्रेसनेही यावरुन पलटवार देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता नौदलातील निवृत्त अधिकाऱ्यानेच याबाबत आपले मत मांडले असून असं काहीही घडलं नसल्याचे अॅडमिरल पसरिचा यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीindian navyभारतीय नौदलRajiv Gandhiराजीव गांधीSonia Gandhiसोनिया गांधी