शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडता येणार नाही; केंद्र सरकारची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 13:18 IST

राजीव गांधी यांच्या हत्येला 27 वर्षे झाली आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना आम्ही भावंडांनी माफ केले आहे असे काही दिवसांपूर्वी विधान केले होते.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या लोकांना मुक्त करता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात मांडली. त्यांच्या हत्येसाठी दोषी ठरलेले सात लोक सध्या तुरुंगात आहेत.या लोकांना मुक्त केल्यास देशभरात आणि जगात चुकीचा संदेश जाईल असे सांगत केंद्र सरकारने त्यांना मुक्त करण्याच्या मागणीवर आक्षेप नोंदवला. या दोषींना सोडण्यात यावे असा प्रस्ताव तामिळनाडू सरकारने नोंदवला होता. जर या गुन्हेगारांना सोडले तर त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटतील आणि घातक पायंडा पडेल अशी भीतीही केंद्र सरकारतर्फे व्यक्त करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयनेही सात दोषींना सोडण्यास विरोध दर्शवला होता. हे दोषी गेली 27 वर्षे तुरुंगात आहेत.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या ही आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांनी आपल्य़ा देशात केलेली अत्यंत भयानक आणि दुष्टपद्धतीने केलेल्या गुन्ह्यांपैकी एक होती अशा शब्दांमध्ये गृहमंत्रालयाने या प्रकरणाचे गांभिर्य आपल्या निवेदनात मांडले आहे. या घटनेत राजीव गांधी यांच्याबरोबर काही लोक व सुरक्षा कर्मचाऱ्यांचेही प्राण गेले होते आणि काही लोक जखमीही झाले होते.आपली बाजू मांडताना केंद्र सरकारने म्हटले, ''राष्ट्रपतींनीही राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी असलेल्या सात लोकांना सोडण्यास व प्रकरण स्थगित करण्याच्या प्रस्तावाला नाकारले होते. राजीव गांधी यांची अत्यंत दुष्टपणे व भयंकर पद्धतीने हत्या करण्यात आली. यामुळे भारतीय लोकशाहीत अडथळा आणण्याचा प्रयत्नही झाला. त्यामुळे कोणतीही सौम्य भूमिका घेण्यासाठी हे दोषी पात्र नाहीत.'' याबरोबरच ''सत्र न्यायालयाने या गुन्ह्यात महिलेचा मानवी बॉम्ब म्हणून वापर करणे ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचे सांगितल्याचे आणि ते उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही स्वीकारल्याचे केंद्र सरकारने सांगितले.''

राजीव गांधी यांच्या हत्येला 27 वर्षे झाल्यानंतर त्यांचे पूत्र आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपण व आपली पहिण प्रियांका यांनी या मारेकऱ्यांना कधीच माफ केले असल्याचे स्पष्ट केले होते. राजीव गांधी यांची महिला सुसाईड बॉम्बरद्वारे एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी 21 मे 1991 रोजी हत्या केली होती.

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयRahul Gandhiराहुल गांधीGovernmentसरकार