रजनीकांतचा 'कबाली' प्रदर्शनापूर्वीच लीक !
By Admin | Updated: July 19, 2016 19:53 IST2016-07-19T19:53:52+5:302016-07-19T19:53:52+5:30
प्रदर्शनापूर्वीच चित्रपट लीक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सैराट,सुलतान, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती नंतर बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित कबाली हा सिनेमाही ऑनलाईन लीक झाला आहे.

रजनीकांतचा 'कबाली' प्रदर्शनापूर्वीच लीक !
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ : प्रदर्शनापूर्वीच चित्रपट लीक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सैराट,सुलतान, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती नंतर बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित कबाली हा सिनेमाही ऑनलाईन लीक झाला आहे. कबाली रिलीज होण्यासाठी अजून तीन दिवस बाकी आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कबालीचे निर्माते चित्रपटाच्या बेकायदेशीर लिंक्स हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कळते. रजनीकांत आणि राधिका आपटेची प्रमुख भूमिका असलेला कबाली येत्या २२ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रपट लीक झाल्याने त्यांच्या बॉक्स ऑफीस कलेक्शनवर बराच परिणाम होताना दिसत आहे.
जगभरात चर्चा असलेल्या कबाली चित्रपटाची कॉपी काही संकेतस्थळांवर डाउनलोडसाठी उपलब्ध असल्याचे कळते. पण हा चित्रपट अद्याप चित्रपट शेअरींग साइट असलेल्या टोरन्टवर आलेला नाही. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याची पायरेटेड कॉपी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मद्रास हाय कोर्टात संपर्क साधला होता. १८० पेक्षाही अधिक संकेतस्थळांवरून या चित्रपटाचे बेकायदेशीर डाउनलोड थांबवण्यासाठी निर्माते एस थानु यांनी याचिकाही दाखल केली होती.