रजनीकांतच्या कबाली सिनेमाच्या टीझरला 1 दिवसात 4 लाख हिट्स
By Admin | Updated: May 2, 2016 22:06 IST2016-05-02T21:59:33+5:302016-05-02T22:06:54+5:30
तामीळ चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार रजनीकांतचा लवकरच कबाली हा नवा सिनेमा येतोय.

रजनीकांतच्या कबाली सिनेमाच्या टीझरला 1 दिवसात 4 लाख हिट्स
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2- तामीळ चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार रजनीकांतचा लवकरच कबाली हा नवा सिनेमा येतोय. या सिनेमाच्या टीझरला एका दिवसात जवळपास 4 लाख हिट्स मिळाल्या आहेत.
दक्षिण भारतीय चित्रपटांच्या तुलनेत कबाली या चित्रपटाच्या टीझरला आतापर्यंतच्या सर्वात जास्त हिट्स मिळाल्या आहेत. 67 सेकंदांच्या या टीझरमध्ये रजनीकांतच्या कबाली या कथानकाचा परिचय देण्यात आला आहे. या चित्रपटात राधिका आपटे, कलायरासमन, दिनेश आणि रित्विका यांनीसुद्धा भूमिका साकारल्या आहेत.
टीझरच्या शेवटच्या क्षणी 1970च्या काळातला रजनीकांत रेस्टॉरंटमधून बाहेर जातानाचा सीन टाकण्यात आला आहे. या सिनेमात रजनीकांतनं डॉनची भूमिका साकारली आहे. या टीझरला प्रत्येक तासाला हिट्स वाढत चालल्या आहेत.