शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटवर गाजतोय 'मर्सल' सिनेमातील 'GST'चा सीन, थलायवा रजनीकांतनंही केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 10:35 IST

'मर्सल' या तमिळ सिनेमावरुन सुरू असलेला वाद एकीकडे संपण्याचा नाव घेत नाहीय, तर दुसरीकडे या सिनेमाचं केवळ प्रेक्षकांकडूनच नाही तर दिग्गजांकडूनही प्रचंड कौतुक केले जात आहे.

नवी दिल्ली - 'मर्सल' या तमिळ सिनेमावरुन सुरू असलेला वाद एकीकडे संपण्याचा नाव घेत नाहीय, तर दुसरीकडे या सिनेमाचं केवळ प्रेक्षकांकडूनच नाही तर दिग्गजांकडूनही प्रचंड कौतुक केले जात आहे. नुकतेच थलायवा रजनीकांत यांनीही 'मर्सल' सिनेमाचं कौतुक करणारे ट्विट केले आहे.  'मर्सल सिनेमामध्ये महत्त्वपूर्ण मुद्दा मांडण्यात आला आहे. यासाठी मर्सल सिनेमाच्या टीमचं अभिनंदन', असे ट्विट करत रजनीकांत यांनी मर्सल सिनेमाचं कौतुक केले आहे. 

मात्र, नेमक्या कोणत्या मुद्यावर सिनेमाचं कौतुक करण्यात आलंय, हे  रजनीकांत यांनी ट्विटमध्ये स्पष्टपणे लिहिले नाही. दरम्यान, या सिनेमात जीएसटीचा उल्लेख करण्यात आला आहे. या दृश्यावर भाजपानं आक्षेप नोंदवला आहे. अभिनेता विजयचा सिनेमा मर्सलमध्ये जीएसटी आणि डिजिटल इंडिया योजनांवर टीका करण्यात आली आहे. यामुळे भाजपानं  या सिनेमाला विरोध दर्शवत सिनेमातील जीएसटीसंदर्भातील संवाद हटवण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान,  'मर्सल' या तामिळ सिनेमावरुन सुरु झालेल्या वादात उडी घेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला खडेबोल सुनावले होते. मर्सल सिनेमातून जीएसटी कररचना आणि डिजिटल इंडिया या मोदी सरकारच्या दोन महत्त्वाच्या निर्णयांवर टीका करण्यात आली आहे. भाजपाने या दृश्यांवर आक्षेप घेत ती सिनेमातून हटवण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी टि्वट करुन या सिनेमाला समर्थन दिले आहे. 

'मोदी मर्सल सिनेमा तमिळ संस्कृती आणि भाषेची अभिव्यक्ती आहे. मर्सलमध्ये हस्तक्षेप करुन तुम्ही तामिळ अभिमानावर बंदी आणू नका' असे टि्वट राहुल यांनी केले आहे. प्रसिद्ध तमिळ अभिनेता विजयची मुख्य भूमिका असलेल्या मर्सल सिनेमात जीएसटीचा उल्लेख आहे. भाजपाला सिनेमातील हे दृश्य अजिबात आवडले नसून, त्यांनी आक्षेप घेत सीन कट करण्याची मागणी केली आहे. 

'चुकीची विधानं करू नयेत'

मी हा सिनेमा पाहिला नाही. पण ज्या लोकांनी हा सिनेमा पाहिला त्यांना जीएसटी आणि डिजिटल पेमेंटबद्दलच्या चुकीच्या माहितीमुळे अपमानित झाल्यासारखे वाटते. जीएसटीचा धोरणात्मक निर्णय होता. केंद्र सरकारने भरपूर अभ्यास करुनच हा निर्णय घेतला. सेलिब्रिटींनी अशी चुकीची विधाने करु नयेत, असे तामिलीसाई सौदराजन म्हणाल्या. त्या तामिळनाडू भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. 

टॅग्स :GSTजीएसटीBJPभाजपाMersalमर्सलrajinikanthरजनीकांत