रजनीकांत 12 डिसेंबरला राजकारणात प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 09:13 AM2017-11-10T09:13:55+5:302017-11-10T09:15:06+5:30

अभिनेते कमल हासननंतर आता अभिनेते रजनीकांत राजकारणात येण्याची घोषणा करू शकतात.

Rajinikanth likely to announce admission in politics on December 12 | रजनीकांत 12 डिसेंबरला राजकारणात प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता

रजनीकांत 12 डिसेंबरला राजकारणात प्रवेशाची घोषणा करण्याची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेते कमल हासननंतर आता अभिनेते रजनीकांत राजकारणात येण्याची घोषणा करू शकतात. रजनीकांत यांच्या जवळच्या काही सुत्रांच्या माहितीनुसार, ते येत्या 12 डिसेंबर रोजी राजकारणात येण्याबद्दलची घोषणा करू शकतात.

चेन्नई- अभिनेते कमल हासननंतर आता अभिनेते रजनीकांत राजकारणात येण्याची घोषणा करू शकतात. रजनीकांत यांच्या जवळच्या काही सुत्रांच्या माहितीनुसार, ते येत्या 12 डिसेंबर रोजी राजकारणात येण्याबद्दलची घोषणा करू शकतात. 12 डिसेंबर रोजी रजनीकांत यांचा वाढदिवस आहे त्याच दिवशी ते त्याच्या राजकारणातील प्रवेशाबद्दलचा खुलासा करण्याची शक्यता आहे. 

रजनीकांत स्वतःच्या वेगळ्या पक्षाची स्थापना करतील. ते भाजपा किंवा इतर कुठल्याही पक्षात सहभागी होणार नाहीत. जर भाजपा लोकसभा निवडणुकीच्या आधी रजनीकांत यांना सदस्य किंवा सहयोगीच्या रूपात त्यांच्या पक्षात सामाविष्ठ करून घेण्याचा प्रयत्न करणार असेल, तेव्हाही रजनीकांत त्यांची शक्ती आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाचवून ठेवतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

रजनीकांत हे अध्यात्मिक आहेत. त्यामुळे ते कधीही डाव्या विचारसरणीला पाठिंबा देणार नाहीत. तसंच ते कट्टरपंथी किंवा उजव्या विचारसरणीचे पण होणार नाहीत. ते प्रत्येक गोष्ट त्याच योग्यतेने पाहतील ज्यामुळे समाजाच्या प्रत्येक स्तरातील लोक त्यांच्याकडे आकर्षित होतील. 

लेखक स्टॅलिन राजनगम यांच्या मते, रजनीकांत कधीही जात आधारीत राहणार नाहीत. डीएमके मजबूत विरोधक नसल्याने ते सत्ता मिळविण्यासाठी दुय्यम ठरतात. पण रजनीकांत यांच्या राजकारणात येण्याने परिस्थिती बदलेल. तर दुसरीकडे काशीनाथ यांनी म्हंटलं, रजनीकांत यांच्या अल्पसंख्यांक मत मिळणार नाहीत. रजनीकांत यांना ते भाजपाचे समर्थक मानतात. रजनीकांत एकटे निवडणूक लढवून सत्तेत येऊ शकत नाहीत. त्यांना त्यासाठी मजबूत गठबंधन करावं लागेल. 
 

Web Title: Rajinikanth likely to announce admission in politics on December 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.