शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

एकाविरुद्ध दहाजणांची एकजूट होत असेल तर शक्तिशाली कोण? रजनीकांत यांनी मान्य केले मोदींचे बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 15:21 IST

दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या भावी राजकीय वाटचाली विषयी संकेत मिळू लागले आहे.

चेन्नई - दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या भावी राजकीय वाटचाली विषयी संकेत मिळू लागले आहे. जर दहा पक्ष एका व्यक्तिविरोधात एकजूट होत असतील तर कोण अधिक शक्तिशाली आहे, हे आपोआप समजून येते. असे सांगत सध्याच्या भारतीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदीच अधिक शक्तिशाली असल्याचे रजनीकांत यांनी यांनी इशाऱ्या इशाऱ्यांमध्ये मान्य केले आहे.  रजनीकांत यांनी राजकारणात उतरण्याची घोषणा केल्यापासून तामिळनाडूमधील राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, रजनीकांत यां नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जायचे की महाआघाडीत सामील व्हायचे याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेतली नाही. पण याबाबतचे संकेत ते देत आहेत.  भाजपा हा खरोखरच धोकादायक पक्ष वाटतो का असे विचारले असता रजनीकांत म्हणाले,'' जर दहा पक्ष असा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी ते खरे असावे. मात्र सध्यातरी मोदी आणि भाजपाबाबत कोणतेही वक्तव्य करण्याचा माझा विचार नाही. पण 10 पक्ष एखाद्या व्यक्तीविरोधात एकत्र येत असतील तर कोण अधिक शक्तिशाली आहे, हे तुम्ही समजू शकता." रजनीकांत यांनी घेतलेली ही भूमिका भाजपासाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे. मात्र काही दिवसांपूर्वी नोटाबंदीबाबत बोलताना रजनीकांत यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली होती.   

टॅग्स :PoliticsराजकारणTamilnaduतामिळनाडूBJPभाजपा