राजधानी एक्स्प्रेस रुळांवरून घसरली, ४ ठार
By Admin | Updated: June 25, 2014 11:20 IST2014-06-25T08:41:25+5:302014-06-25T11:20:37+5:30
दिल्लीहून दिब्रुगडला जाणा-या राजधानी एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे

राजधानी एक्स्प्रेस रुळांवरून घसरली, ४ ठार
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५ - दिल्लीहून दिब्रुगडला जाणा-या राजधानी एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील छप्रा येथे झालेल्या या अपघातात १२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यरात्री दोनच्या सुमारास छप्रा येथे गाडी आली असता डबे रुळांवरून घसरले. अपघाताचे वृत्त कळताचा रेल्वे व बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाख झाले ऊसन अपघातग्रस्त एक्स्प्रेसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, या अपघातामागे घातपाताची शक्यता रेल्वे बोर्डाकडून वर्तवण्यात येत आहे.
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबाबत शोक व्यक्त केला असून आज ते घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. दरम्यान, अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये, गंभीर जखमींसाठी १ लाख रुपये व किरकोळ जखमींसाठी २० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.