राजधानी एक्स्प्रेस घसरली

By Admin | Updated: June 26, 2014 01:49 IST2014-06-26T01:49:18+5:302014-06-26T01:49:18+5:30

बिहारच्या सारण जिल्ह्यातील छपरा येथून 2 कि. मी. अंतरावर छपरा- गोल्डनगंज स्थानकादरम्यान आज बुधवारी पहाटे दिल्ली-दिब्रुगड राजधानी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरल़े

Rajdhani Express collapsed | राजधानी एक्स्प्रेस घसरली

राजधानी एक्स्प्रेस घसरली

>चौघांचा मृत्यू; 23 जखमी : नक्षल्यांचा हात असल्यावरून रेल्वे, बिहार सरकारचे परस्परविरोधी दावे
छपरा/पाटणा/नवी दिल्ली : बिहारच्या सारण जिल्ह्यातील छपरा येथून 2 कि. मी. अंतरावर छपरा- गोल्डनगंज स्थानकादरम्यान आज बुधवारी पहाटे दिल्ली-दिब्रुगड राजधानी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरल़े या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अन्य 23 जण जखमी झाल़े यापैकी 13 जणांची स्थिती गंभीर असल्याचे कळत़े रेल्वेने पूर्व सर्कलच्या रेल्वे सुरक्षा आयुक्ताद्वारे या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत़
दरम्यान, या अपघातामागे नक्षल्यांचा हात असल्याच्या शक्यतेवरून रेल्वे व बिहार सरकार परस्परविरोधी दावे करताना दिसत आहेत. रेल्वेने या अपघातामागे नक्षली घातपाताची शक्यता वर्तवली असतानाच बिहार सरकारने मात्र ही शक्यता धुडकावून लावली             आह़े केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथसिंह आणि रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनीही या अपघातामागे नक्षल्यांचा हात आहे, असे म्हणणो घाईचे ठरेल, असे सांगून ही शक्यता तूर्तास नाकारली आह़े राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आदींनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आह़े
आज बुधवारी पहाटे 2 वाजून 11 मिनिटाला हा अपघात झाला़ यात राजधानीचे 12 डबे रुळावरून घसरल़े बी-1, बी-2, बी-3, बी-4 आणि पैंटरी कार डबे उलटले, तर बी-5 ते बी-1क् हे सहा डबे आणि पावर कार रुळावरून खाली घसरल़े एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंप झाल्यासारखे वाटल़े प्रचंड आवाज झाला आणि रेल्वे थांबली़
 रेल्वेमंत्र्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख, तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 2क् हजार रुपयांची मदत जाहीर केली आह़े
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
अपघातामागे घातपात असल्याचे रेल्वे बोर्डाचे संकेत
4रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणोंद्र कुमार यांनी प्रथमदृष्टय़ा हा अपघात घातपात भासत असल्याचे म्हटले आह़े रुळावर स्फोट झाला होता़ त्यामुळे राजधानी रुळांवरून घसरली असावी़ स्थानकापासून 6क् किमी अंतरावर एक अन्य मालगाडीही स्फोटामुळे रूळावरून घसरली आहे, असे कुमार म्हणाल़े  सुरक्षा दलाने उघडलेल्या मोहिमेविरूद्ध माओवाद्यांनी या भागांत ‘बंद’ पुकारला होता़ 
4भाकपा माओवादी या प्रतिबंधित संघटनेचा तिरहुत आणि सारण कमिटीचा प्रवक्ता प्रहार याने काल मंगळवारी संध्याकाळी मीडियाला एक पत्रक पाठवून गत रात्री 12 वाजेपासूनच बंद पुकारला होता़ यादरम्यान हिंसाचाराचा इशाराही त्याने दिला होता़ या पाश्र्वभूमीवर या अपघातामागे नक्षली घातपात असल्याचा संशय त्यांनी वर्तवला आह़े 
 
राज्य सरकारचा इन्कार
4बिहार सरकारने मात्र अशी शक्यता नाकारली आह़े यामागे नक्षल्यांचा हात असल्याचे कुठलेही संकेत वा परिस्थितीजन्य पुरावे आढळलेले नाहीत, असे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केल़े
 
भाजपा खासदाराचा दावा
4सारणचे भाजप खासदार राजीव प्रताप रूडी यांनी या घटनेमागे नक्षल्यांचा हात असल्याचे संकेत दिले आह़ेत़ रूळांच्या फिश प्लेटमध्ये लागलेले 2क् स्प्रिंग काढलेले आढळले आह़े फिश प्लेटचा एक स्प्रिंग काढण्यासाठी त्यावर कमीत कमी पन्नास घणाचे घाव घालावे लागतात आणि यासाठी मानवी शक्तीची गरज भासते, असे रूडी म्हणाल़े 
 
रेल्वेवर दोषारोपण!
4प्रत्येक राजधानी एक्सस्प्रेसला रवाना करण्याच्या अर्धा तास आधी संबंधित मार्गावरून पायलट इंजिन रवाना केले जात़े असे झाले असते तर आजचा अपघात झाला नसता़ याचमुळे या घटनेमागे रेल्वेचा निष्काळजीपणा असल्याचे कुठेना कुठे वाटते, असे मुख्यमंत्री जीतनराम मांझी म्हणाल़े
 घाईने निष्कर्ष नको..
4अपघातामागे नक्षल्यांचा हात आहे, असे म्हणणो तूर्तास घाईचे ठरेल़, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले.
4अपघाताच्या कारणावरून बिहार सरकार व रेल्वेत सुरू झालेल्या वाक्युद्धावर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
राजधानी एक्सस्प्रेसला अपघात झाला त्या घटनास्थळापासून 6क् किमी अंतरावरील चकिया- मेहर्षी रेल्वे स्थानकानजिक एक मालगाडीही रूळावरून घसरली़ यात कुण्याही प्राणहानीचे वृत्त नाही़ तथापि मालगाडीच्या 18 डब्यांचे मोठे नुकसान झाले आह़े मालगाडीत लोखंडी सळया होत्या़ 

Web Title: Rajdhani Express collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.