राजदीप सरदेसाईंची अमेरिकेतल्या मोदीभक्तांशी झटापट
By Admin | Updated: September 29, 2014 14:14 IST2014-09-29T14:14:26+5:302014-09-29T14:14:26+5:30
अमेरिकेतल्या मोदीप्रेमींची पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याशी काल चांगलीच बाचाबाची झाली आणि एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर हातापायीपर्यंत वेळ आली.

राजदीप सरदेसाईंची अमेरिकेतल्या मोदीभक्तांशी झटापट
>ऑनलाइन टीम
न्यू यॉर्क, दि. २९ - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयघोष करणा-या अमेरिकेतल्या मोदीप्रेमींची पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याशी काल चांगलीच बाचाबाची झाली आणि एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर हातापायीपर्यंत वेळ आली. मॅडिसन स्क्वेअरमध्ये पंतप्रधानांच्या भाषणाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर ही घटना किंचित गालबोट लावणारीच ठरली आहे.
सरदेसाई मोदींच्या भाषणाआधी चाहत्यांशी संवाद साधत होते, परंतु चाहत्यांचा एकूण मूड मोदींचा जयघोष करण्याचा व राजदीप यांच्याकडे मोदीविरोधक म्हणून बघण्याचा होता. त्यामुळे सरदेसाई व गर्दी यांचा तालमेळ बसत नव्हता यावरून तुमच्याकडे पैसा आहे परंतु क्लास नाही असं म्हणण्याची मजल सरदेसाई यांनी गाठली तर कॅश फॉर व्होट स्कॅमवर तुमचं काय म्हणणं आहे असं गर्दीतल्या मोदीप्रेमींनी विचारलं. त्यापाठोपाठ एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत एका मोदीसमर्थकाची सरदेसाई यांच्याशी झटापट झाली. मोदींच्या भाषणापूर्वी झालेल्या या प्रकाराच्या व्हिडीयो क्लिप्स लगोलग यू ट्यूब वर टाकण्यात आल्या असून त्या व्हॉट्स अप सारख्या माध्यमातून सर्वतोमोबाईल झाल्या आहेत.
मोदीप्रेमींनी आपल्या उत्साहाला आवर घालायला हवा असा सल्ला त्यांना जाणकार देत आहेत, त्याचप्रमाणे सरदेसाईंसारख्या पत्रकारांनीही अशा वातावरणामध्ये काम करताना भान ठेवून वागायला हवे असा सल्ला देण्यात येत आहे.