शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नियतीचा असाही खेळ! अंगणातून सोबतच निघाली दोन सख्ख्या भावांची अंत्ययात्रा, गावावर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 09:33 IST

Rajasthan : गावातील लोकांनी सांगितलं की, दोन्ही भावातील नातं खूप चांगलं होतं. सोहम सिंह अभ्यासात हुशार होता आणि सुमेर थोडा कमजोर होता. मोठ्या भावाच्या शिक्षणाचा खर्च लहान भाऊ सुमेर सिंह करत होता.

Rajasthan : राजस्थानच्या बाडमेरमध्ये दोन सख्ख्या भावाच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. लहान भावाच्या निधनानंतर घरी आलेल्या मोठ्या भावाचा पाण्याचा टाकीत पडून मृत्यू झाला. जेव्हा घरातून दोन्ही भावांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा सगळेच रडायला लागले होते. दोन्ही भावांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना बाडमेरच्या सिणधरी भागातील होडू गावातील आहे.

रिपोर्टनुसार, होडू गावातील 26 वर्षीय सुमेर सिंह गुजरातच्या सूरतमध्ये काम करत होता. 1 दिवसाआधी म्हणजे मंगळवारी तो पाय घसरून छतावरून खाली पडला होता. पण उपचारादरम्यान सुमेर सिंहचं हॉस्पिटलमध्ये निधन झालं. लहान भावाच्या मृत्यूनंतर मोठ्या भावाला घरी बोलवण्यात आलं.बुधवारी सकाळी सोहन सिंह घराच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीतून बकेटीने पाणी काढत होता. तो अचानक त्यात पडला आणि त्याचाही मृत्यू झाला.

28 वर्षीय सोहन जयपूरमध्ये सेकंड ग्रेडचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. वडिलांची तब्येत बिघडली असं कारण सांगत सोहन सिंह याला घरी बोलवण्यात आलं. या घटनेनंतर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

असं सांगण्यात येत आहे की, जेव्हा बराच वेळ सोहन घरी परतला नाही तेव्हा लोकांनी टाकीजवळ जाऊन पाहिलं तर त्याचा मृतदेह पाण्यात तरंगत होता. लगेच याची सूचना पोलिसांना देण्यात आली आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून चौकशी सुरू करण्यात आली. गावातील लोकांनी सांगितलं की, दोन्ही भावातील नातं खूप चांगलं होतं. सोहम सिंह अभ्यासात हुशार होता आणि सुमेर थोडा कमजोर होता. मोठ्या भावाच्या शिक्षणाचा खर्च लहान भाऊ सुमेर सिंह करत होता.

पोलिसांनी सांगितलं की, एका भावाचा मृत्यू सूरतमध्ये छतावरून पडून झाला तर दुसरा भाऊ पाण्यात टाकीत पडला होता. कुटुंबियांनी सांगितलं की, टाकीत पडल्याने सोहमचा मृत्यू झाला. आत्महत्येचाही संशय व्यक्त केला जात आहे. अशात पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानDeathमृत्यू