राजस्थान - आमदाराच्या मुलाने बीएमडब्ल्यू रिक्षाला ठोकली, 3 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: July 2, 2016 15:05 IST2016-07-02T15:05:43+5:302016-07-02T15:05:43+5:30
राजस्थान पोलिसांनी अपक्ष आमदार नंदकिशोर मेहराई यांचा मुलगा सिद्धार्थ मेहराई याला दारुच्या नशेत गाडी चालवत तिघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे

राजस्थान - आमदाराच्या मुलाने बीएमडब्ल्यू रिक्षाला ठोकली, 3 जणांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत -
जयपूर, दि. 02 - राजस्थान पोलिसांनी अपक्ष आमदार नंदकिशोर मेहराई यांचा मुलगा सिद्धार्थ मेहराई याला अटक केली आहे. सिद्धार्थ मेहराईने सी स्कीम परिसरात बीएमडब्ल्यू रिक्षाला ठोकली ज्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. रिक्षाला धडक दिल्यानंतर कारने पोलिसांच्या गाडीलाही धडक दिली ज्यामध्ये 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्दार्थ मेहरिया अपघात झाला त्यावेळी दारुच्या नशेत होता. अपघातामध्ये सहाय्यक पोलीस अधिक्षक जखमी झाले असून अजून 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सिद्धार्थ मेहरिया याने मात्र आपण गाडी चालवत नव्हतो तसंच दारु प्यायलो नव्हतो असा दावा केला आहे. अपघातानंतर सिद्धार्थ मेहरिया याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.