शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

'पद्मावत'विरोधात शोले स्टाईल आंदोलन ! पेट्रोल घेऊन 350 फूट उंच मोबाइल टॉवर चढला तरुण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 17:12 IST

सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरही पद्मावत सिनेमासंदर्भातील वाद संपत नाहीयत. राजस्थानच्या भीलवाडा परिसरातून एक  नवीन प्रकरण समोर आले आहे.

नवी दिल्ली - सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरही पद्मावत सिनेमासंदर्भातील वाद संपत नाहीयत. राजस्थानच्या भीलवाडा परिसरातून एक  नवीन प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एक तरुण पेट्रोल घेऊन 350 फूट उंच मोबाइल टॉवरवर चढला असून त्यानं भलतीच अट स्थानिक प्रशासनासमोर ठेवली आहे. जोपर्यंत पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावर संपूर्ण देशात बंदी लादण्यात येत नाही, तोपर्यंत या मोबाइल टॉवरवरुन उतरणार नाही, अशी निराळीच अट त्यानं ठेवली आहे. दरम्यान, 25 जानेवारीला पद्मावत सिनेमा संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे.

भीलवाडा जिल्हा प्रशासन आणि पोलीस घटनास्थळवर पोहोचले असून या तरुणाला समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हा तरुण आपल्या मागणीवर ठाम आहे. पद्मावतच्या प्रदर्शनावर संपूर्ण देशात बंदी आणावी, अन्यथा येथेच आत्महदन करेन,असा इशारा त्यानं दिला आहे. या घटनेमुळे प्रशासनाची घाबरगुंडी उडाली आहे. 

करणी सेनेच्या धमकीनंतरही 'पद्मावत'साठी होतेय जोरदार ऑनलाइन बुकींग

'पद्मावत' सिनेमासंदर्भातील वाद संपुष्टात येण्याचं नावच घेत नाहीयत. 25 जानेवारीला हा सिनेमा देशभरात बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सुप्रीम कोर्टानं सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवलेला असतानाही गुजरात आणि राजस्थानमध्ये या अद्यापही तीव्र निदर्शनं सुरूच आहेत. अशातच सिनेमा पाहण्यापासून वंचित राहिले जाऊ नये, यासाठी सिनेचाहत्यांनी पद्मावत सिनेमाचं  ऑनलाइन तिकीट बुक करण्यास सुरुवात केली आहे. एकूण चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकसहीत अन्य राज्यांमध्येही ऑनलाइन तिकीट बुकींग करण्यात येत आहे.  

एकीकडे 'पद्मावत' सिनेमाला तीव्र विरोध जरी दर्शवण्यात येत असला तर दुसरीकडे चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पद्मावत सिनेमाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर सिनेमासाठीच्या अॅडवान्स्ड बुकींगसाठी लिंक शेअर करण्यात आली आहे आणि चाहत्यांना सिनेमा रिलीजच्या एक दिवस आधीच पहिल्या दिवसाचा शो बुक करण्यासंबंधची माहिती पुरवण्यात आली आहे. पद्मावत सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

 

संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित 'पद्मावत' सिनेमावर बंदी घालण्यासंदर्भातील राजस्थान व मध्य प्रदेश सरकारकडून करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी (23 जानेवारी) सुनावणी होणार आहे.  'पद्मावत' सिनेमा बॉक्सऑफिसवर रिलीज करण्याच्या निर्णयावर तातडीनं बंदी घालण्यात यावी, कारण हा सिनेमामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचं दोन्ही राज्यांचं म्हणणं आहे. 

'पद्मावत'च्या रिलीजवर बंदी आणण्यासाठी राजस्थान-मध्य प्रदेश सरकारची याचिका

करणी सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राजस्थानचे गृहमंत्री कटारिया यांनी सांगितले होते की, सर्वसामान्य जनतेच्या भावना जपाव्यात, असे सरकारचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे, कायदा सुव्यवस्था राखण्यात अडचणी निर्माण झाल्यास राज्य सरकारला सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याचा अधिकार देण्यात यावा, कारण सिनेमामुळे शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे, असे सांगत मध्य प्रदेश सरकारनं पद्मावतवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याचा अधिकार राज्य सरकारला कायद्यानुसार असल्याचंही मध्य प्रदेश सरकारनं सांगितले आहे. मात्र यापूर्वी झालेल्या 18 जानेवारीला झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं चार राज्यांमध्ये 'पद्मावत' सिनेमावर लावण्यात आलेल्या बंदीच्या निर्णयावर स्थगिती आणली होती. 

टॅग्स :Padmavatपद्मावतSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळीDeepika Padukoneदीपिका पादुकोण