शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

पिटबुलचा 11 वर्षीय मुलावर हल्ला, शरीरावर 32 ठिकाणी घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 10:27 IST

Pitbull Dog Attack:अशाप्रकारचे कुत्रे पाळण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज असते.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी पिटबुलच्या हल्ल्यात कर्नाटकमधील व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

जयपूर-जयपूरममध्ये एका 11 वर्षीय मुलावर पिटबुल जातीच्या कुत्र्याने हल्ला करुन शरीरावर 32 ठिकाणी चावल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलाच्या चेहरा आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या असून, त्याला जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर महानगर पालिकेने पिटबुलला आपल्या ताब्यात घेतले आहे. पिटबुल जातीचा कुत्रा अतिशय हिंस्त्र स्वभावाचा असतो. देशातील अनेक राज्यांमध्ये या कुत्र्याला पाळण्यास बंदी आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जयपूरमधील अजमेर रोडवरील हनुमान वाटिकामध्ये दुर्गेश हाडा यांचा बंगला घर आहे. जगदीश मीना नावाचा व्यक्ती त्यांच्या घरात बागकाम आणि वॉचमनची नोकरी करायचा. जगदीश आपल्या कुटुंबासह हाडा यांच्या बंगल्यातील गॅरेजमध्ये राहत होता. घटनेच्या दिवशी जगदीश यांचा 11 वर्षीय मुलगा हाडा यांच्याकडे असलेल्या पाळीव पिटबुलकडे गेला. काही वेळानंतर अचानक त्या मुलाचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आला.

पिटबुलने कुत्र्याला आपल्या जबड्यात पकडलेमुलाचा आवाज ऐकून जगदीश यांची पत्नी धावत गेली असता तिला धक्काच बसला. पिटबुलने त्या मुलाला आपल्या जबड्यात पकडले होते आणि तो मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावू लागला. आईने कसेबसे आपल्या मुलाला त्या कुत्र्याच्या तावडीतून सोडवले आणि जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात भरती केले.

घरमालकावर गुन्हा दाखलपोलिसांनी घरमालक दुर्गेश हाडावर हलगर्जीपणा आणि जगदीश यांच्या कुटुंबाला शांत राहण्यासाठी धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. तसेच, महापालिकेच्या अॅनिमल शाखेने पिटबुलला आपल्या ताब्यात घेतले आहे. नियमानसार, अशाप्रकारचे कुत्रे पाळण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज असते. पण, हाडाकडे कुठल्याही प्रकारचे रजिस्ट्रेन नव्हते. 

पिटबुलमुळे अनेकांचा जीव जातोजयपुर नगर पालिकेतील अधिकारी अरुण वर्मा यांनी सांगितले की, या जातीच्या कुत्र्याला घरात पाळण्यास जयपूरमध्ये बंदी आहे. तसेच, देशातील अनेक राज्यांमध्येही याला पाळण्यास बंदी असल्याचे त्यांनी सांगितले. तिकडे कर्नाटकमध्ये 12 मे 2021 रोजी पिटबुलने एका व्यक्तीचा जीव घेतला होता. तसेच, अमेरिकेत दरवर्षी पिटबुलच्या हल्ल्यात 50 जणांचा जीव जातो.

टॅग्स :Rajasthanराजस्थानdogकुत्राjaipur-pcजयपूर