शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात पुन्हा राडा! आता नागौर येथे ईद साजरी करताना मुस्लीम समाजातील दोन गटांत दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 19:39 IST

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील नागौर येथे ईद साजरी करताना मुस्लीम समाजातील दोन गटांमध्ये काही गोष्टीवरून वाद निर्माण झाला. यानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.

राजस्थानातील जोधपूर येथील हिंसाचारानंतर, आता नागौर येथूनही हिंसाचाराचे वृत्त येत आहे. नागौर येथे ईद साजरी करण्यावरून एकाच समाजाच्या दोन गटांत वाद निर्माण झाला. नंतर हा वाद एवढा वाढला, की हे दोन गट एकमेकांसोबतच भिडले. यावेळी दोन्ही गटांत तुफान दगडफेक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील नागौर येथे ईद साजरी करताना मुस्लीम समाजातील दोन गटांमध्ये काही गोष्टीवरून वाद निर्माण झाला. यानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीनंतर वाद आणखी वाढला. यानंतर या वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागौर शहरातील किदवई कॉलनी घडली. घटनेची माहिती मिळताच नागौर शहरातील पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर, त्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना समजवून शांत केले.

जोधपूर येथेही ईदच्या दिवशीच हिंसाचार -तत्पूर्वी, जोधपूर येथेही ईदच्या दिवशीच लाउडस्पीकर आणि झेंड्याच्या मुद्द्यावरून हिंसाचार झाला. यात अनेक लोक जखमी झाले. येथील वाद एवढा वाढला होता, की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. एवढेच नाही, तर येथे आश्रूधुराचे गोळेही सोडण्यात आले. याशिवाय, मंगळवारी अनंतनाग येथेही मशिदीबाहेर दगडफेक झाली. ईदच्या नमाजनंतर, आंदोलकांनी संरक्षण दलाच्या जवानांवर दगडफेक केली. मध्य प्रदेशातील खरगोन येथेही दंगलीच्या 22 दिवसांनंतर, कर्फ्यूमध्येच सन साजरा केला गेला. येथे तब्बल 1300 पोलीस कर्मच्याऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानMuslimमुस्लीमPoliceपोलिस