शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर लघुशंका करताना आढळले राजस्थानचे मंत्री, टीका झाल्यावर म्हणाले ही तर जुनी परंपरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 15:04 IST

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही भूमिका घेत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेतेमंडळी या अभियानाचा बोऱ्या वाजवताना दिसत आहेत.

अजमेर - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही भूमिका घेत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेतेमंडळी या अभियानाचा बोऱ्या वाजवताना दिसत आहेत. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारमध्ये मंत्री असलेले शंभू सिंह यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या छायाचित्रामध्ये ते उघड्यावर लघुशंका करताना दिसत आहे. शंभू सिंह यांचे हे छायाचित्र व्हायरल झाल्यापासून त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. त्यामाध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पण या प्रकाराचा कुठलाही खेद वा खंत नसलेल्या या मंत्रिमहोदयांनी मात्र उघड्यावर लघुशंका करणे ही आपली जुनी परंपरा आहे, असे सांगत आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.  हे छायाचित्र अजमेरमधील ज्या ठिकाणावरून काढण्यात आले त्याच्या जवळच भाजपाने एका सभेचे आयोजन केले होते. दरम्यान, हे छायाचित्र व्हायरल झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना  मंत्री म्हणाले की, उघड्यावर शौच करणे आणि लघुशंका करणे यात फरक आहे. मी जिथे लघुशंका केली. त्याच्या आसपार मुतारी नव्हती. त्यामुळे नाईलाजाने मला उघड्यावर लघुशंका करावी लागली.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपाministerमंत्री