शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Rajasthan Lok Sabha Election Result 2024 : "प्राण जाए पर वचन न जाए", दौसामधून भाजपाच्या पराभवानंतर किरोरीलाल मीना देणार मंत्रीपदाचा राजीनामा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 15:29 IST

Rajasthan Lok Sabha Election Result 2024 : आतापर्यंतच्या निवडणुकीत भाजपाला १४, काँग्रेसला ८, सीपीआय(एम) १, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष आणि भारत आदिवासी पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळताना दिसत आहे.

दौसा : देशभरात लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे संपल्यानंतर आज मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, यावेळी राजस्थान लोकसभा निवडणुकीत मोठा बदल दिसून येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत क्लीन स्वीप करणाऱ्या भाजपाला यावेळी दहा जागांवर पराभव पत्करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत भाजपाला १४, काँग्रेसला ८, सीपीआय(एम) १, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष आणि भारत आदिवासी पार्टीला प्रत्येकी एक जागा मिळताना दिसत आहे.

दौसा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मुरारीलाल मीणा विजयी झाले आहेत. भाजपाचे कन्हैयालाल मीना यांचा पराभव करत काँग्रेस नेते मुरारीलाल मीणा हे  दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. दरम्यान, दौसामधून भाजपाचा पराभव झाल्यास किरोरीलाल मीना यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता येथून कन्हैयालाल मीना यांचा पराभव झाल्याने किरोरीलाल मीना यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

जीव गेला तरी चालेल पण वचन मोडणार नाही - किरोरीलाल मीणा दरम्यान,  भाजपा नेते आणि मंत्री किरोरीलाल मीणा यांनी मतमोजणीपूर्वी हे विधान केले होते. आता दौसा येथील भाजपा उमेदवाराच्या पराभवाच्या निकालानंतर किरोरीलाल मीणा यांनी सोशल मीडियावरील एक्सवरून मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटर रामचरित मानसमधील एक चौपाई लिहिली आहे आणि ते त्यांच्या शब्दांवर ठाम राहतील असे म्हटले आहे.किरोरी लाल मीना यांनी लिहिले की, 'रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए'. त्यामुळे आता या पोस्टवरू एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, दौसा येथील भाजप उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर किरोरीलाल मीना मंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात.

भाजप नेत्याने काय विधान केले होते?राजस्थानमधील सात पैकी एकही जागा भाजपाने गमावली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे विधान दौसा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान कॅबिनेट मंत्री किरोरीलाल मीणा यांनी केले होते. या जागांमध्ये भरतपूर, ढोलपूर करौली, दौसा, अलवर, जयपूर ग्रामीण, टोंक सवाई माधोपूर, कोटा बुंदी यांचा समावेश आहे. दरम्यान, मतमोजणीच्या कलांनुसार यापैकी अनेक जागांवर भाजपचा पराभव होत आहे.  

टॅग्स :rajasthan lok sabha election 2024राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४dausa-pcदौसा