शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानातील अर्भक मृत्यूची हायकोर्टाने घेतली स्वत:हून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 06:16 IST

राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांत अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची राजस्थान उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली

जयपूर : राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांत अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची राजस्थान उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली असून, याप्रकरणी राज्य सरकारने आपले म्हणणे आणि सर्व माहिती न्यायालयाला सादर करावी, असे आदेश दिले आहेत. कोटा रुग्णालयातील अर्भकांच्या मृत्यूचे प्रकरण अगदी अलीकडचे आहे. त्या प्रकाराने केवळ राजस्थानातच नव्हे, तर संपूर्ण देशात खळबळ माजली. केंद्र सरकारने या प्रकरणाची माहिती राज्य सरकारकडून मागवून घेतली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोटा रुग्णालयात केंद्रीय पथकही पाहणीसाठी पाठविले होते. हे पथक येणार असल्याचे कळताच राजस्थान सरकार जागे झाले. लगेचच राज्याचे आरोग्यमंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री सचिन पायलट हेही कोटा रुग्णालयात गेले. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून अर्भकांच्या मृत्यूची माहिती मागवून घेतली. तसेच असे प्रकार अजिबात होता कामा नयेत, असेही मुख्यमंत्र्यांना सांगितले. भाजपने तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. बसपाप्रमुख मायावती यांनीही गेहलोत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. बसपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये गेल्याने त्या संतापल्या आहेत.>कुठे किती मृत्यू?राजस्थानच्या बिकानेर येथील रुग्णालयात १६२ अर्भके आतापर्यंत मरण पावली असून, जोधपूरच्या सरकारी रुग्णालयात १४६ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. कोटा येथील सरकारी रुग्णालयातील अर्भकांच्या मृत्यूची संख्या ११० आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेबु्रवारी रोजी होणार आहे.