शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल कल्याण सिंह म्हणे, आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते, मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 16:04 IST

राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी केलेल्या विधानावरून ते विरोधकांच्या टीकेचे धनी झाले आहेत.

अलिगडः राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी केलेल्या विधानावरून ते विरोधकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. अलिगडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी भाजपाला लोकसभा निवडणुकीत विजय मिळायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान झालेलं पाहायला आवडेल, असं विधानही त्यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानांवरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. कल्याण सिंह 23 मार्च रोजी अलिगडमध्ये पत्रकारांशीच बोलताना म्हणाले, आम्ही सर्वच लोक भाजपाचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे भाजपा पुन्हा विजयी होऊन मोदी पंतप्रधान झालेलं पाहायला आम्हाला आवडेल. त्यांचं पुन्हा पंतप्रधान बनणं हे देश आणि समाजासाठी गरजेचं आहे.अलिगडमध्ये भाजपानं जाहीर केलेले उमेदवार आणि विद्यमान खासदार सतीश कुमार गौतमचे स्थानिक कार्यकर्ते विरोध करत आहेत. कल्याण सिंह यांनी भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांना उद्देशून हे विधान केलं होतं. परंतु या विधानानंतर ते अडचणीत सापडले आहे. राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. या पदावर विराजमान व्यक्तीनं कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेणं योग्य नाही. 87 वर्षीय कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 6 डिसेंबर 1992मध्येही अयोध्येतील बाबरी पाडण्याच्या वेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.या घटनेनंतर कल्याण सिंह सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. 1999मध्ये त्यांनी भाजपा सोडून जनक्रांती पक्षाची स्थापना केली. परंतु कालांतरानं त्यांनी जनक्रांती पक्ष भाजपामध्ये विलीन केला. 2014मध्ये केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर कल्याण सिंह यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे पुत्र राजवीर सिंह एटा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ सरकारमध्ये शिक्षा राज्यमंत्री आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक