शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘राजस्थानातील सरकार कोसळू शकते’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 04:33 IST

कर्नाटक आणि गोव्यातील घटनेची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे.

जयपूर : कर्नाटक आणि गोव्यातील घटनेची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. राजस्थानातील सरकार कोसळू शकते, असाही दावा भाजपचे आमदार वासुदेव देवनानी यांनी केला आहे.विधानसभा परिसरात मीडियाशी बोलताना आमदार वासुदेव देवनानी म्हणाले की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे आमदार धास्तावलेले आहेत. मुख्यमंत्री गेहलोत यांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे ते असे विधान करत आहेत की, राज्यातील लोक त्यांनाच मुख्यमंत्रीपदी ठेवू इच्छितात. जर गावागावातील लोकांची अशी इच्छा आहे, तर ते त्यांना स्वत:च्या बूथवर पराभव का स्वीकारावा लागला?आमदार वासुदेव देवनानी म्हणाले की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेहलोत यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा होती. मात्र, गेहलोत यांनी स्पष्ट केले की ते जाण्यासाठी अनिच्छुक आहेत.भाजपचे आमदार अशोक लाहोटी म्हणाले की, गेहलोत यांनी १० जुलै रोजी सादर केलेले बजेट हे शेवटचे असेल. गेहलोत काही दिवसांत दिल्लीला रवाना होतील. दोन महिन्यात राजस्थानात राजकीय अस्थिरता निर्माण होईल.भाजपचे आमदार कालिचरण सराफ म्हणाले की, राजस्थानात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. गेहलोत आणि पायलट यांच्यातील अंतर्गत वादामुळे सरकार धोक्यात आहे आणि ते कधीही कोसळूशकते.>‘आमचे आमदार धोका देणार नाहीत’राज्यातील गेहलोत यांच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे मंत्री बी.डी. कल्ला यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजप एकीकडे नैतिकतेच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतो. काँग्रेसचे आमदार प्रशांत बैरवा म्हणाले की, काँग्रेसचे आमदार पक्षाला धोका देणार नाहीत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेस