अजून एक कन्हैय्या तयार होऊ नये यासाठी राजस्थान सरकारने केला पाठ्यपुस्तकात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 13:46 IST2016-03-21T13:46:39+5:302016-03-21T13:46:39+5:30
कन्हैय्या कुमारचा आदर्श घेऊन अजून एक कन्हैय्या जन्माला येऊ नये यासाठी राजस्थान सरकार अभ्यासक्रमातच बदल करणार आहे

अजून एक कन्हैय्या तयार होऊ नये यासाठी राजस्थान सरकारने केला पाठ्यपुस्तकात बदल
>ऑनलाइन लोकमत -
जयपूर, दि. २१ - देशविरोधी घोषणा दिल्यावरुन देशद्रोहाच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या कन्हैय्या कुमारचा आदर्श घेऊन अजून एक कन्हैय्या जन्माला येऊ नये यासाठी राजस्थान सरकार अभ्यासक्रमातच बदल करणार आहे. राजस्थानचे शिक्षामंत्री वासुदेव देवनानी यांनी ही माहिती दिली आहे.
अभ्यासक्रमात बदल करुन स्वातंत्र्यसैनिकांची आत्मचरित्र पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल केले जात आहेत. वासुदेव देवनानी यांनी विधानसभेत बोलताना ही माहिती दिली आहे. हेमू कलानी, महाराज दहरसेन आणि स्वामी तौरम यांची आत्मचरित्र या पुस्तकात समाविष्ट केली जाणार आहेत. तर जॉन किट्स, विल्यिअम ब्लेक यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात आले आहेत.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला अफजल गुरुच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कन्हैय्या कुमारवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. त्याची नंतर जामीनावर सुटका करण्यात आली होती.