शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात काळी बुरशी महामारी जाहीर; नियमांचे पालन न केल्यास होणार कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 09:49 IST

हरयाणा सरकारनेही आधीच केली घोषणा

जयपूर : कोरोना महामारीतून सुरक्षितरीत्या बाहेर पडलेल्यांपैकी अनेक जण आता काळी बुरशीला (ब्लॅक फंगस किंवा म्युकरमायकोसिस) तोंड देत आहेत. देशात अनेक राज्यांत काळी बुरशीचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. राजस्थान सरकारने राज्यात काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून हा आजार महामारी जाहीर केला आहे. एकच दिवस आधी हरयाणा सरकारनेही काळी बुरशीला महामारी जाहीर केलेले आहे. हरयाणा सरकारने महामारीबाबत आवश्यक निर्देश जारी केले असून, त्यांचे पालन न झाल्यास दंडनीय कारवाई केली जाणार आहे.

राजस्थानच्या आरोग्य विभागाने जारी या अधिसूचनेनुसार कोरोना विषाणूच्या फैलावाच्या परिणामामुळे म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे कोविड-१९ व काळी बुरशीवर एकीकृत उपचार व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले.

दिल्लीत १६० रुग्ण घेताहेत उपचारदिल्ली-एनसीआरमध्ये काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) हात -पाय पसरत असून, दिल्लीत आतापर्यंत त्याचे १६० रुग्ण आढळले असून, ते वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी काळी बुरशी वाढण्याचे कारण अनियंत्रित मधुमेह आणि स्टेरॉइडयुक्त औषधांचे सेवन असल्याचे सांगितले.

डॉ. गुलेरिया म्हणाले की, ‘अनेक वेळा लोकांना हेच समजत नाही की, आपल्याला मुधमेह आहे. स्टेरॉइड घेतल्यानंतर मधुमेहाची पातळी ३०० ते ४०० होते. त्यामुळे थेट नुकसान होते. काळी बुरशीमुळे चेहरा प्रभावित होतो, फुप्फुसे, मेंदू आणि डोळ्यांपर्यंत तो पसरू शकतो. डोकेदुखी, नाकातून रक्त येणे, चेहरा सुजणे, ताप, खोकला, छातीत वेदना आदी लक्षणे असतात. कोरोना संक्रमणामुळे हा आजार जास्त धोकादायक बनला आहे.’

स्टेरॉइड देत असाल तर रुग्णाची देखरेख करण्याची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्याची आहे. रुग्णाला गरजेनुसार स्टेरॉइड पाच ते दहा दिवसांपर्यंत दिले जाते. जर जास्त प्रमाणात रुग्णाला औषध दिले जात असेल तर काळी बुरशीची शक्यता खूप निर्माण होते. त्यामुळे रुग्णाची देखभाल करणे खूप गरजेचे असते, असे सांगून गुलेरिया म्हणाले, ‘रुग्णाला मध्यम आणि गंभीर लक्षणे नसतील तर स्टेरॉइड दिले जाऊ नये. रुग्णाच्या मधुमेहाची पातळीही पाहणे आवश्यक आहे.’

टॅग्स :Rajasthanराजस्थानcorona virusकोरोना वायरस बातम्या