शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Rajasthan Assembly Elections 2018: JNUमधील कंडोम मोजणाऱ्या भाजपा आमदाराचा पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 11:14 IST

जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीमध्ये रोज 3 हजार कंडोम मिळत असल्याचा दावा केला होता.

नवी दिल्ली: राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या 31 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाने 15 आमदार आणि 3 मंत्र्यांचा पत्ता कट केला असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपाने ज्या आमदारांचा आणि मंत्र्यांच्या पत्ता कट केला आहे, त्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणारे ज्ञानदेव आहुजा, धनसिंह रावत आणि राजकुमार रिणवा यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश आहे. 

भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीमध्ये रोज 3 हजार कंडोम मिळत असल्याचा दावा केला होता. 2016 साली ज्ञानदेव आहुजा यांनी असे विधान केले होते. जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीमध्ये रोज 50 हजार हडांचे तुकडे, सिगारेटची 10 हजार थोटके, 3 हजार वापरण्यात आलेले कंडोम आणि अबॉर्शन करण्यासाठी वापरण्यात आलेले 500 इंजेक्शन मिळतात, असे त्यांनी म्हटले होते. तसेच, युनिव्हर्सिटीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी नेकेड डान्स करत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. 

ज्ञानदेव आहुजा राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील रामगडचे भाजपा आमदार आहेत. ज्ञानदेव आहुजा यांच्याशिवाय धनसिंह रावत आणि राजकुमार रिणवा यांनी सुद्धा वादग्रस्त विधाने केली होती. तसेच, किशनाराम नाई, लक्ष्मीनारायण बैरवा, आरसी सुनेरीवाल, जीतमल खांट, रानी कोली, शैतान सिंह, तरुण राय कागा, छोटू सिंह भाटी, कृष्ण कडवा, गीता वर्मा, राजकुमारी जाटव, मंगला राम, रानी सिलोटिया, शिमला बावरी या आमदारांना भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीत डच्चू दिला आहे. 

राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताबदल !गेल्या 25 वर्षांत राजस्थानच्या जनतेने सतत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिला आहे. 1993 मध्ये भैरोसिंह शेखावत, 1998 मध्ये अशोक गेहेलोत, 2003 मध्ये वसुंधरा राजे, 2008 पुन्हा अशोक गेहेलोत आणि 2013 साली पुन्हा वसुंधराराजे असा सत्ताबदल झाला. यंदा निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून सरकारविरोधी सूर दिसत आहे. त्यामुळे 180 जागा निवडून आणण्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासमोर पुन्हा सत्ता राखण्याचे आव्हान आहे. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाElectionनिवडणूक