शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रघुराम राजन राज्यसभेत जाणार ? आम आदमी पक्षातर्फे संधी मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 12:39 IST

रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षातर्फे राज्यसभेत जाण्याची संधी मिळण्याची शक्यता सूत्रांद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआम आदमी पक्षाचे दुसरे नेते कुमार विश्वास यांनी आपल्याला राज्यसभेत जाण्याची इच्छा असून एका वाहिनीला मुलाखत देताना, "मी सुद्धा माणूस आहे, मलासुद्धा आकांक्षा आहेत. " असे थेट वक्तव्य केले होते.

नवी दिल्ली- रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षातर्फे राज्यसभेत जाण्याची संधी मिळण्याची शक्यता सूत्रांद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचे दिल्ली विधानसभेत प्रचंड बहुमत असल्यामुळे या पक्षाला आपल्यातर्फे तीन सदस्य राज्यसभेत पाठवता येणार आहे.गेले काही दिवस आम आदमी पक्षामध्ये राज्यसभेत कोणाला पाठवायचे यावरुन चर्चा होत असून यावरुन पक्षामध्ये दोन मतप्रवाहही आहेत. काही नेत्यांनी आपल्याला राज्यसभेत जायचे आहे अशी इच्छा उघडपणे व्यक्त केली आहे तर राजकारणाबाहेरील व्यक्ती राज्यसभेत पाठवल्या जाव्यात असाही मतप्रवाह पक्षामध्ये आहे. त्यामुळेच रघुराम राजन यांचे नाव या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे बोलले जात आहे. आम आदमी पक्षाचे दुसरे नेते कुमार विश्वास यांनी आपल्याला राज्यसभेत जाण्याची इच्छा असून एका वाहिनीला मुलाखत देताना, "मी सुद्धा माणूस आहे, मलासुद्धा आकांक्षा आहेत. " असे थेट वक्तव्य केले होते. त्यामुळे कुमार विश्वास यांना राज्यसभेचे तिकीट मिळणार का हा प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे.

आम आदमी पक्षामध्ये राज्यसभेच्या जागांवरुन कुमार विश्वास आणि मनिष सिसोदिया, अरविंद केजरीवाल असे दोन गट पडल्याचे सांगण्यात येते. कुमार विश्वास यांच्याबरोबर आपला मिळणाऱ्या राज्यसभेच्या तीन जागांमध्ये आशुतोष सिंग, संजय सिंहसुद्धा इच्छुकांच्या यादीमध्ये पुढे आहेत. कुमार विश्वास यांच्यावर रा. स्व.संघाचे एजंट असल्याचा तसेच ते भाजपाच्या वाटेवर असल्याचा आम आदमी पक्षातून नेहमी आरोप होत राहिला आहे. त्यामुळे कुमार विश्वास यांना तिकीट नाकारून अरविंद केजरीवाल त्यांची आणखी नाराजी ओढावून घेतात की त्यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाऊ देतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल. आम आदमी पक्ष याच महिन्यात स्थापनेची पाच वर्षेही पूर्ण करत आहे.

जानेवारी 2018 मध्ये राज्यसभेच्या दिल्लीमधील तीन जागा भरल्या जाणार असून विधानसभेत बहुमत असल्यामुळे या तिन्ही जागा आम आदमी पक्षाला मिळणार आहेत. आता रघुराम राजन यांना आम आदमी पक्षाने खरेच राज्यसभेची संधी दिली तर ते त्यावर कोणता निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Indiaभारत