शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

PUBG खेळताना विद्यार्थ्याचे फेसबुक आयडी हॅक; 4 दिवस खाणे-पिणे बंद, 'अशी' झाली अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 12:27 IST

पबजी खेळताना 11 वीतील विद्यार्थ्याचे फेसबुक आयडी हॅक झाले आहे.

नवी दिल्ली : PUBG खेळण्याच्या नादात राजन राज नावाच्या बिहारमधील 11 वीतील मुलाचे फेसबुक आयडी हॅक झाले आहे. आयडी हॅकर स्वत:ला उत्तर प्रदेशातील यूट्यूबर असल्याचे म्हणत आहे. फेसबुकची आयडी रिकव्हर करण्यासाठी हॅकरने विद्यार्थ्याकडून आतापर्यंत 600हून अधिक रूपये उकळले आहेत. परंतु हॅकरने विद्यार्थ्याला आयडी परत केला नाही. 

तुझ्या आयडीवरून सगळ्यांना चुकीचे मेसेज पाठवेन असे म्हणत हॅकर विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करत आहे. यामुळे विद्यार्थी निराश झाला असून अस्वस्थ आहे. मागील चार दिवसांपासून त्याने खाणेपिणे बंद केले आहे. त्यामुळे घरातील सदस्यही नाराज आहेत. आयडीसाठी विद्यार्थ्याने त्याच्या आईसह शनिवारी शहर पोलीस स्थानकात धाव घेतली. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला समजावून सांगितले की, तू फेसबुक आयडी हॅक झाल्याची माहिती तुझ्या सोशल मीडियावरील इतर अकाउंटवरून मित्रांना दे. तसेच स्टेट सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवा. तुम्ही तक्रारीची प्रत घेऊन फेसबुकला तक्रार केल्यास आयडी परत केली जाईल.

आतापर्यंत 600 रूपये उकळलेविद्यार्थ्याच्या आईने पोलिसांकडे व्यथा मांडताना म्हटले, त्यांचा मुलगा अवघ्या 17 वर्षांचा आहे, त्याला मोबाईलवर पबजी गेम खेळण्याचे व्यसन लागले आहे. मात्र, याच दरम्यान त्याचा फेसबुक आयडी कोणीतरी हॅक केला आहे. आतापर्यंत 600 रूपये देखील उकळले आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्याच्या आईला समजावून सांगितले की, पबजी गेम खेळल्याने मुलामध्ये आत्महत्येची प्रवृत्ती निर्माण होते. मग पोलिसांसमोर विद्यार्थ्याच्या आईने मोबाईलमधून पबजी गेम डिलीट केला.

असा केला फेसबुक आयडी हॅक  पबजी खेळत असताना फेसबुकवर लॉग इन करावे लागते. त्यानंतर इतर राज्यातील किंवा देशांतील गेमर्ससह एकत्र खेळू शकतात. अनेक गेमर एक टीम तयार करून एकत्र खेळतात. विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की हा आयडी हॅकर जो स्वतःला यूट्यूबर म्हणत होता. त्याने सांगितलेल्या 3 स्टेप्समुळे विद्यार्थी अडचणीत आला आहे. त्याने क्वाइन देण्याचे नाटक केले अन् त्याला लिंक पाठवली. लॉग ऑन केल्यानंतर त्याचा युजर आयडी दिसला आणि त्याचा फेसबुक आयडी हॅक झाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :BiharबिहारFacebookफेसबुकPUBG Gameपबजी गेमPoliceपोलिस