राजनने उघड केली दाऊदसाठी काम करणा-या पोलिसांची नावे ?

By Admin | Updated: November 6, 2015 12:51 IST2015-11-06T12:49:39+5:302015-11-06T12:51:36+5:30

डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करणा-या मुंबई पोलिस दलातील काही अधिका-यांची नावे छोटा राजनने उघड केल्याचे वृ्त आहे.

Rajan disclosed the name of police working for Dawood | राजनने उघड केली दाऊदसाठी काम करणा-या पोलिसांची नावे ?

राजनने उघड केली दाऊदसाठी काम करणा-या पोलिसांची नावे ?

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ६ -  डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करणा-या मुंबई पोलिस दलातील काही अधिका-यांची नावे छोटा राजनने उघड केल्याचे वृ्त आहे. यातील बहुसंख्य अधिकारी आता निवृत्त झाले असून छोटा राजनने नेमकी कोणाची नावे सांगितले हे मात्र समजू शकलेले नाही.

इंडिया टुडे व अन्य काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार इंडोनेशियातून भारतात आणल्यावर छोटा राजनला दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. चौकशीदरम्यान छोटा राजनने दाऊदसाठी काम करणा-या काही पोलिस अधिका-यांची नावे उघड केली आहेत. याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. 

मुंबई पोलिस दलाीतील काही अधिकारी दाऊदसाठी काम करत असून पोलिसांना हाताशी धरुन दाऊदने माझ्याविरोधात कट रचल्याा दावा राजनने यापूर्वीही केला होता.त्यामुळे राजनच्या पोलखोलमुळे या अधिका-यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागतो की काय यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान छोटा राजनच्या उपस्थितीमुळे दिल्लीतीली सीबीआय मुख्यालयाबाहेरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

Web Title: Rajan disclosed the name of police working for Dawood