शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोनमच्या ‘बेवफाई’चा मेघालयला आर्थिक फटका, राजाच्या हत्येनंतर अनेकांनी रद्द केल्या बुकिंग्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:17 IST

Raja Raghuwanshi Murder Case: राजा हत्याकांडाचा मेघालयच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे.

Raja Raghuwanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पती-पत्नीच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे फक्त दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला नाही, तर जिथे ही घटना घडली, त्या मेघालय राज्यालाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. मेघालयातील शिलॉंग येथे सोनम आणि राजा हनिमून साजरा करण्यासाठी गेले होते, मात्र तिथेच सोनमने राजाचा काटा काढला. या घटनेचा मेघालयातील पर्यटनावर मोठा परिणाम पडला आहे.

राजा रघुवंशीच्या हत्येसाठी पत्नी सोनमने मेघालय निवडले. प्रियकराच्या मदतीने सोनमने आधी राजाला ठार मारले अन् नंतर त्याचा मृतदेह दरीत फेकला. या घटनेनंतर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. पर्यटक आता मेघालयाला सुरक्षित मानत नाहीत. अनेक हॉटेलमधील बुकिंग रद्द करण्यात आली आहेत, ज्यामुळे येथील स्थानिक लोकही खूप निराश झाले आहेत. 

हॉटेल उद्योगावर परिणामशिलाँगमधील अल्पाइन हॉटेलचे व्यवस्थापक सचिन म्हणतात की, या घटनेनंतर हॉटेल उद्योगावर परिणाम झाला आहे. ५ ते १० टक्के बुकिंग रद्द झाल्या असून, नवीन बुकिंगही कमी झाली आहे. मेघालय पूर्णपणे सुरक्षित आहे, पण राज्याला बदनाम करण्याचा कट रचला जातोय.

मेघालय टुरिझम फोरमचे कार्यकारी सदस्य कमल अग्रवाल असेही म्हणतात की, मेघालय पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल बुकिंग रद्द करण्यात येत आहेत. पर्यटन उद्योगाचे नुकसान होत आहे. हॉटेल बुकिंग रद्द केल्याने टॅक्सी उद्योगावरही परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी सुमारे १६ लाख पर्यटक मेघालयाला भेट देतात, परंतु या घटनेनंतर पर्यटकांच्या संख्येवर मोठा परिणाम पडू शकतो. 

टॅग्स :tourismपर्यटनCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टhusband and wifeपती- जोडीदार