शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:02 IST

२२ मे रोजी हे जोडपे मावलाखियात गावात पोहोचले होते आणि ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ पाहण्यासाठी गेले. त्यांनी तिथल्या एका होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता ते स्कूटीवर बाहेर पडले आणि त्यानंतर दोघेही गायब झाले.

मेघालयमधील निसर्गरम्य शिलाँगमध्ये सुरु झालेली एक हनिमून ट्रिप एका भयानक हत्येच्या रूपात संपली. इंदूर येथील नवविवाहित राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी २० मे २०२५ रोजी शिलाँगला पोहोचले होते. परंतु, अवघ्या तीन दिवसांत, २३ मे रोजी एक असा कट रचण्यात आला, ज्याने राजाचा जीव घेतला आणि देशभरात खळबळ माजवली. या गुन्ह्यात आता त्याची पत्नी सोनम हिचेच नाव पुढे आले असून, तीच पतीच्या हत्येच्या कटात सहभागी होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

हत्या कशी घडली?२२ मे रोजी हे जोडपे मावलाखियात गावात पोहोचले होते आणि ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ पाहण्यासाठी गेले. त्यांनी तिथल्या एका होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता ते स्कूटीवर बाहेर पडले आणि त्यानंतर दोघेही गायब झाले.

२४ मे रोजी रात्री त्यांची स्कूटी शिलाँगपासून २५ किमी अंतरावर ओसारा हिल्सच्या पार्किंगमध्ये सापडली. २८ मे रोजी जंगलात दोन बॅगा सापडल्या. राजाच्या भावाने या बॅगांची ओळख पटवली. त्याच दिवशी वेसाडोंग धबधब्याजवळ एका खोल दरीतून राजाचा मृतदेह सापडला. त्याच्या मृत देहाजवळ सोनमचे कपडे, औषधं, आणि एक रक्ताने माखलेला 'दाओ' (खासी जमातीचा पारंपरिक चाकू) मिळाला. पोस्टमॉर्टम अहवालानुसार राजावर निर्दयपणे हल्ला झाला होता – त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून, चाकूने अनेक वार करण्यात आले होते.

कुणी केला पहिला वार?तपासाच्या पुढील टप्प्यात समोर आले की, सोनमचे इंदूरमध्येच राहणाऱ्या राज कुशवाह नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. पोलिसांनी या प्रकरणात राज कुशवाहसह विकी ठाकूर आणि आनंद या दोघांनाही अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हत्या घडवून आणण्याची योजना सोनम आणि राज कुशवाहने एकत्रितपणे आखली होती. यानंतर आनंदने राजावर पहिला वार केला, त्यानंतर इतर आरोपींनी राजाला ठार मारले. या सर्व घटनेचा राज कुशवाह फोनद्वारे पाठपुरावा करत होता.

सोनमचाच सहभाग, आत्मसमर्पणानंतर कबुली!सोनम तब्बल १७ दिवस बेपत्ता होती. अखेर ८ जून रोजी ती उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील एका ढाब्यावर अत्यंत अस्वस्थ अवस्थेत आढळली. तिने स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत खळबळजनक कबुली दिली की, तिनेच पतीच्या हत्येसाठी भाडोत्री गुंडांना सुपारी दिली होती.

या धक्कादायक ट्विस्टने संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे. मात्र, सोनमच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केला की, ते त्यांच्या मुलीला तिच्या मुलीला जबरदस्तीने गुन्हेगार ठरवत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सोनम निर्दोष आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी