शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackerey: "शरद पवारांनी 5 वेळा माफी मागितली असती, ते मोठ्या मनाचे राजकारणी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 17:59 IST

मनसेकडून राज यांना हिंदूजननायक अशी उपाधी दिली असताना उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज यांचा उल्लेख खलनायक असा केला.

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे पुढील महिन्यात 5 जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. तत्पूर्वी त्यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध करत राज यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. राज यांच्या भूमिकेचं राज्यातील भाजपच्या नेत्यांनी स्वागत केलं. मात्र, राज यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंहांनी विरोध केला आहे. राज यांना अयोध्येत पाऊलही टाकू देणार नाही, असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिलाय. विशेष म्हणजे ते आजही आपल्या मतावर ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. 

मनसेकडून राज यांना हिंदूजननायक अशी उपाधी दिली असताना उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज यांचा उल्लेख खलनायक असा केला. राज यांच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती, याची आठवण सिंह यांनी करून दिली. त्यामुळे, 2008 पासून मी राज ठाकरेंचा विरोध करतो, असे ते म्हणाले. मी मराठी लोकांच्या किंवा महाराष्ट्राच्या विरोधात नसून केवळ एका व्यक्तीच्या विरोधात आहे. त्यामुळे, त्या व्यक्तीने उत्तर प्रदेशची माफी मागावी, किंवा येथील संतांची माफी मागावी, असे आवाहन सिंह यांनी केले आहे. 

बृजभूषण सिंह हे लोकसभा खासदार आहेत. त्यामुळे, त्यांचे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे स्नेहाचे संबंध असल्याचंही त्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे या संसदेत बाकावर आमच्यासाठी खायला पदार्थ घेऊन येतात, अशी आठवणही त्यांनी सांगितली. तर, शरद पवार हे मोठ्या मनाचा माणूस आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 5 वेळा माफी मागितली असती, असे म्हणत सिंह यांनी राज ठाकरेंना टोलाही लगावला.  

मोदींची माफी मागावी

राज ठाकरेंना विरोध केल्यानंतर भाजप नेत्यांना वाईट वाटायचं कारण नाही. राज ठाकरे हे भाजपचे नेते नाहीत. राज ठाकरेंच्या दौऱ्याचं समर्थन केल्यास भाजपलाही त्यांच्या मताची चिंता नाही का, भाजपला युपीचे मत नको आहेत का? असे म्हणत बृजभूषणसिंह यांनी भाजपचा आणि या दौऱ्याचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले. तसेच, जर वाटत असेल तर राज ठाकरेंनी भाजपच्या शिर्ष नेतृत्वाची म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागावी, असेही बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. 

मुंबई भाजपातूनही विरोध

राज ठाकरेंनी फेरीवाले, टॅक्सीवाले, मजूर यांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनी केली आहे. 'मी इथूनच विरोध करत आहे. मला अयोध्येला जाण्याची गरज नाही. तिथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित आहेत, त्यांचा राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध आहे,' असं ठाकूर म्हणाले.  मी घटनात्मक पद्धतीनं विचार मांडत आहे. दृष्कृत्याला दृष्कृत्य करून विरोध करण्याची गरज नाही. मात्र आम्ही राज यांच्यावर निश्चितपणे दबाव आणू शकतो. राज यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी स्वच्छ चारित्र्य घेऊन देशासमोर जायला हवं. त्यामुळे तुमचं हे पाऊल केवळ राजकारणासाठी नसल्याचं स्पष्ट होईल, असं ठाकूर यांनी म्हटलं.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारBJPभाजपाMember of parliamentखासदारNarendra Modiनरेंद्र मोदी