रायसोनी फन स्कूल स्नेहसंमेलन- उमंग
By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:35+5:302016-02-05T00:33:35+5:30
जळगाव- पिंप्राळा येथील रायसोनी फन स्कूल येथे झालेल्या स्नेहसंमेलन (उमंग) बालगंधर्व खुलेनाट्यगृहात उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तीककुमार पांडेय, अपण जिल्हाधिकारी गुलाबराव खरात आणि चंदेल उपस्थित होते. संस्थाध्यक्ष शिरीष रायसोनी, उमेद रायसोनी, अजित रायसोनी उपस्थित होते.

रायसोनी फन स्कूल स्नेहसंमेलन- उमंग
ज गाव- पिंप्राळा येथील रायसोनी फन स्कूल येथे झालेल्या स्नेहसंमेलन (उमंग) बालगंधर्व खुलेनाट्यगृहात उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच प्रमुख पाहुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तीककुमार पांडेय, अपण जिल्हाधिकारी गुलाबराव खरात आणि चंदेल उपस्थित होते. संस्थाध्यक्ष शिरीष रायसोनी, उमेद रायसोनी, अजित रायसोनी उपस्थित होते. शाळेतील गुणवंत विद्यार्थी पृथ्वीराज हजारी, वेद राऊत, सोहम शर्मा, वेदान्त आमले, स्नेहल सोनजे, अनन्या सिंघ, योगेश शर्मा, अश्वीनी चौधरी, हर्षल साळुंखे, दक्षता पाटील यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी फुलपाखरु, दगड, दगड बेटीया थिम, भगतसिंग थिम, मल्हारी या गाण्यांवर बहारदार नृत्य सादर केले.सूत्रसंचालन पूजा शिरसाठ, आशुतोष ब्रााणे, कुलकर्णी यांनी केले. मुख्याध्यापिका भाग्यश्री परदेशी तसेच शाळेच्या शिक्षक-शिक्षिका योगिता भोसले, देवश्री चक्रवर्ती, राणा खान, शीतल सपकाळे, अपर्णा पाटील, नीलेश पाठक यांचे सहकार्य लाभले.