शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्लीत गोळीबार सर्रास, दहशतीचे वातावरण...", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:51 IST

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही सिंगला स्वीट्ससमोर उभे आहोत, हे खूप व्यस्त मार्केट आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. रविवारी अरविंद केजरीवाल दिल्लीतील टिळक नगर येथील कार शोरूममध्ये गेले होते. याठिकाणी जून महिन्यात खंडणीसाठी गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. याठिकाणी अरविंद केजरीवाल यांनी पीडित कुटुंबाचीही भेट घेतली. यानंतर सिंगला स्वीट्स येथेही भेट दिली. येथे काही महिन्यांपूर्वी दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही सिंगला स्वीट्ससमोर उभे आहोत, हे खूप व्यस्त मार्केट आहे. काही महिन्यांपूर्वी सिंगला स्वीट्स येथे दोन दुचाकीस्वार आले आणि त्यांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. शूट आऊटच्या काही दिवस आधी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. शूट आऊटनंतर पुन्हा फोन आला आणि तुम्हाला काहीही होऊ शकते, अशी धमकी दिली. दिल्लीत असे गोळीबार सामान्य झाले आहेत. नागलोईला गेलो होतो, तिथेही गोळीबार झाला होता. यावर्षी 160 खंडणीचे कॉल आले आहेत, जे पोलीस रेकॉर्डमध्ये आले आहेत. अनेकजण भीतीमुळे सांगत नाहीत.

सध्या दिल्लीत दहशतीचे वातावरण आहे. आपण अशी दिल्ली कधीच पाहिली नव्हती. आम्ही शांतताप्रिय लोक आहोत. आपल्याला शांततेत राहायचे आहे. काही लोक इतर राज्यात व्यवसाय घेऊन जात आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच, हे गँगस्टर 17-17 वर्षांच्या मुलांचा वापर करत आहेत. दुसरीकडे, बेरोजगारी पसरत असून अशा कामात बेरोजगार मुलांना कामाला लावले जात आहे. मला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगायचे आहे की, आम्हाला राजकारण नको आहे. तुम्हाला वाटेल ते काम करा, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला.

नरेश बालियान यांच्या अटकेवरूनही हल्लाबोलआपचे आमदार नरेश बालियान यांनी अटक करण्यात आली आहे. या अटकेचा संदर्भ देत अरविंद केजरीवाल म्हणाले की, नरेश बालियान यांना 35-40 वेळा धमकीचे फोन आले होते. पीडित हे आमदार असून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा कोणता संदेश दिला जात आहे? तुम्हाला धमक्या दिल्यास आणि तुम्ही तक्रार केल्यास तुम्हाला अटक केली जाईल. पीडित लोकांना आपण संरक्षण दिले पाहिजे, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी