पावसाच्या बातमीत बॉक्स...

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:44+5:302015-06-15T21:29:44+5:30

बॉक्स..

The rainy season box ... | पावसाच्या बातमीत बॉक्स...

पावसाच्या बातमीत बॉक्स...

क्स..
सुरेंद्रगड येथील घर पडले
नागपूर : मान्सूनच्या पहिल्या पावसाने सोमवारी उपराजधानीत जोरदार हजेरी लावली. मात्र सुमारे एक तास धो-धो आलेल्या या पावसात सुरेंद्रगड येथील नरेश खंडाळे यांचे घर पडल्याची घटना पुढे आली आहे. परंतु सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती मिळताच त्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमन पथकाच्या मदतीने घराचा मलबा हटविण्यात आला. अग्निशमन विभागाच्या मते, घटनेच्या वेळी घरात कुणीही नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. याशिवाय पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. रामझुला चौक व श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स शेजारी मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दुसरीकडे घाट रोडवरील एक झाड पडले आहे.
.......

Web Title: The rainy season box ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.