शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये पावसाचा हाहाकार, ६७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 04:21 IST

केरळमध्ये ८ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोची : केरळमध्ये ८ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम येथे अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. निसर्गाच्या या प्रकोपामुळे आतापर्यंत ६७ जणांचा बळी गेला असून मुसळधार पावसाचा फटका येथील विमानसेवेलाही बसला आहे. अतिदक्षतेचा इशारा म्हणून कोची येथील आंतरराष्टÑीय विमानतळाच्या सेवा शनिवार, १८ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.पावसामुळे येथील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे़ त्यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. मदत व बचाव कार्य वेगाने सुरू आहे. कोची विमानतळानजीक असलेल्या पेरियार नदीवरील धरण अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यातच येथील वायंड, कोझिकोडे, कन्नूर, केसरगोडे, मलप्पूरम, पलक्कड, इडुक्की तसेच इरनाकुलम जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वप्रथम खबरदारी म्हणून बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत येथून एकाही विमानाचे उड्डाण न करण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला होता. पुढील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे कोचीन विमानतळ प्रशासनाने जाहीर केले होते. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने तसेच पाण्याचा निचरा होत नसल्याने आता शनिवारपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने जाहीर केला आहे.कोझीकोड, इरानल स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे गुरुपायर-चेन्नई एग्मोर एक्स्प्रेस, कन्याकुमारी-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस, दिबुगढ-कन्याकुमारी विवेक एक्स्प्रेस आणि गांधीधाम-तिरुनेलवली हमसफर एक्स्प्रेस या चार गाड्या उशिराने धावत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :RainपाऊसKeralaकेरळ