हिवरखेड येथे वादळी वार्यासह पाऊस स्लग: अनेक घरे, झाडांची पडझड
By Admin | Updated: June 15, 2014 01:35 IST2014-06-14T20:23:48+5:302014-06-15T01:35:25+5:30
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक घरांसह झाडांची पडझड झाली.

हिवरखेड येथे वादळी वार्यासह पाऊस स्लग: अनेक घरे, झाडांची पडझड
हिवरखेड: तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे शुक्र वार १३ जून रोजी वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक घरांसह झाडांची पडझड झाली. जवळपास तासभर पडलेल्या मान्सूनच्या पावसाने शेतकर्यांसह ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला तरी, या पावसाने परिसरात चांगलीच दाणादाण उडविली होती.
हिवरखेड येथे शुक्र वार १३ जून रोजी ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वार्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वार्यामुळे अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये प्रकाश वाकोडे यांचे घर पडले. त्यांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली, तर दूरचित्रवाणी संचही फुटला. अजमत खाँ यांच्या घरावरील पूर्ण टिनपत्रे उडून गेली आणि त्यातीलच एक टिन जवळच असलेल्या रोहित्रावर आदळल्यामुळे मोठा आवाज होऊन वीज पुरवठा खंडित झाला, तसेच सुरेश इंगळे, सत्यविजय करिंगे, यांच्या घरावरील टिनपत्रेही उडून गेली. वादळी वार्यामुळे वाकोडे यांच्या घराजवळील विजेचा खांबही वाकला. तथापि, विज वितरणच्या कर्मचार्यांनी तत्परतेने त्या वीज खांबाची दुरुस्तीही केली. वादळी वार्यामुळे काही ठिकाणी मोठमोठे वृक्षही उन्मळून पडले. ग्रामस्थांनी तलाठी अढाऊ यांना नुकसानीबाबत फोनवरून माहिती दिली. दरम्यान, नायब तहसीलदार किटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जि.प. सदस्य जमीरउल्ला खान उपस्थित होते.