राज्यात पाऊस परतणार

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:37+5:302015-08-26T23:32:37+5:30

- कोकणात सर्वदूर पाऊस

Rainfall in the state will return | राज्यात पाऊस परतणार

राज्यात पाऊस परतणार

-
ोकणात सर्वदूर पाऊस
पुणे : राज्यात पाऊस पुन्हा परतणार आहे. पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. गेल्या २४ तासांत कोकणात सर्वदूर पाऊस पडला. याव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र पाऊस पडला नाही.
गेल्या २४ तासांत भिवंडी येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पाऊस पडला. त्यापाठोपाठ कल्याण, माथेरान, पनवेलमध्ये १००, अंबरनाथमध्ये ९०, ठाणे येथे ८०, देवगड, कुडाळ, उल्हासनगर, विक्रमगड येथे ७०, दापोली, हर्णे, कर्जत येथे ६०, महाड, शहापूर, महाबळेश्वर येथे ५०, गुहागर, जव्हार, कणकवली, रत्नागिरी, उरण, गगनबावडा, पुणे-वडगाव मावळ येथे ४०, चिपळूण, पालघर, पोलादपूर, राजापूर, रोहा, संगमेश्वर, इगतपुरी येथे ३०, सावंतवाडी, श्रीवर्धन, राधानगरी, सिन्नर येथे २०, मालवण, मुंबई, मुरूड, पुणे-आंबेगाव-जुन्नर-राजगुरुनगर, कोल्हापूर, ओझर, संगमनेर, शाहूवाडी येथे १० मिमी पाऊस पडला.
घाटमाथ्यांवरही जोरदार पाऊस पडत आहे. लोणावळा घाटात १००, डुंगरवाडी, ताम्हिणी, वळवण, खंद घाटात ७०, भिवपुरी घाटात ६०, वाणगाव घाटात ५०, शिदोटा, दावडी घाटात ४०, शिरगाव, ठाकूरवाडी, अम्बोणे, कोयना घाटात ३० मिमी पाऊस पडला.
गुरुवारी कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यापाठोपाठ शुक्रवार आणि शनिवारी मराठवाडा व विदर्भात, तर रविवारी मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Rainfall in the state will return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.