राजूर परिसरात अवकाळी पाऊस
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:11+5:302015-04-13T23:53:11+5:30
राजूर : राजूर परिसराला अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले. राजूरला एक तासात सुमारे २४ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कांदा पिकाबरोबर उभ्या असलेल्या भाजीपाल्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर भर दुपारीच पावसाने सुरुवात केल्यामुळे येथील आठवडे बाजारकरूंचीही एकच धावपळ उडाली.

राजूर परिसरात अवकाळी पाऊस
र जूर : राजूर परिसराला अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले. राजूरला एक तासात सुमारे २४ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कांदा पिकाबरोबर उभ्या असलेल्या भाजीपाल्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर भर दुपारीच पावसाने सुरुवात केल्यामुळे येथील आठवडे बाजारकरूंचीही एकच धावपळ उडाली.आज सकाळी दहा वाजताच आकाशात मोठ्या प्रमाणात ढग जमा होऊ लागले होते. दुपारी तीन वाजता जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात सुमारे एक तास जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतात उभे असलेले कांदा पीक व काढून ठेवलेल्या कांद्यांबरोबर टोमॅटो, उन्हाळी बाजरी व अन्य भाजीपाल्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोमवारी येथील आठवडे बाजार असतो. बाजारकर्यांची एकच धावपळ उडाली. पाडाळणे परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.