शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल, पंजाब, काश्मिरात पावसाचा कहर, उत्तर भारतात मुसळधार पावसाचे ११ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 04:51 IST

हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, पंजाब, उत्तराखंड या राज्यांत पावसाचा कहर सुरू असून, अनेक ठिकाणी दरडीही कोसळत आहेत. उत्तर भारतात या पावसाने ११ बळी घेतले आहेत.

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, पंजाब, उत्तराखंड या राज्यांत पावसाचा कहर सुरू असून, अनेक ठिकाणी दरडीही कोसळत आहेत. उत्तर भारतात या पावसाने ११ बळी घेतले आहेत. २४ तासांत अरुणाचल प्रदेश, आसाम,मेघालय, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच उत्तर भारतात उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली व हिमाचल प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे.हिमाचलच्या अनेक भागात मुसळधार पावसाने आलेल्या नद्यांना आलेल्या पुरात एक इसमाचा आणि एका मुलीचा मृत्यू झाला. कुल्लू जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रवासी बस, ट्रकसह अनेक वाहनेही पुरात वाहून गेली आहेत. अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर काही पुरात वाहून गेली आहेत. पावसाचा जोर असतानाच रोहतांग पाससह अनेक भागांत आताच बर्फवृष्टी सुरू झाली आहे.कुल्लू जिल्ह्यात रविवारी डोबी येथे अचानक आलेल्या पुरानंतर हवाई दलाच्या जवानांनी १९ जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. राज्याच्या ८ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कांगडा, चंबा, मंडी जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रावी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. डोंगरी भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. चंबा जिल्ह्यात २४ तासात १८० मिमी पाऊस झाला. काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून सोमवारी २९ जणांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या.पंजाबात रेड अलर्टचंदीगड : पंजाबमध्ये दोन दिवसांपासून मुसळधारपाऊस होत असून राज्य सरकारने सोमवारी रेड अलर्ट जारी केला आहे.मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बेठक घेतली.आपत्कालिन स्थिती ओढावल्यास सैन्याला तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या