नगरमध्ये पावसाचा चौकार

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:41+5:302015-09-07T23:27:41+5:30

अहदनगर : शहर आणि परिसरात सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही प्रमाणात शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस जिल्‘ात सर्वदूर नसला तरी काही तालुक्यात त्याचे प्रमाण चांगले आहे. यामुळे शेतकर्‍यांसोबत सर्व सामान्यांच्या पावसा बाबतच्या आशा उंचावल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत.

Rainfall in the city | नगरमध्ये पावसाचा चौकार

नगरमध्ये पावसाचा चौकार

दनगर : शहर आणि परिसरात सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही प्रमाणात शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर नसला तरी काही तालुक्यात त्याचे प्रमाण चांगले आहे. यामुळे शेतकर्‍यांसोबत सर्व सामान्यांच्या पावसा बाबतच्या आशा उंचावल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत.
पावसाने ताण दिल्याने जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून पावसाने कमी अधिक प्रमाणात बरसण्यास सुरूवात केली आहे. यामुळे परतीचा पाऊस दुष्काळातून तारून नेईल, अशी आशा सामान्य नागरिक, शेतकरी आणि प्रामुख्याने सरकारी यंत्रणा बाळगूण आहे. पोळा सण, त्यानंतर येणारे गणेश उत्सव आणि नवरात्रीत पाऊस झाल्यास शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नगर शहरात सलग चौथ्या दिवशी पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले. हा पाऊस शहरालगत असणार्‍या ग्रामीण भागात झाला आहे. यामुळे या ठिकाणी चारा पिकांना जीवदान मिळाले आहे.
..............
रविवारी झालेला पाऊस
राहुरी ३६ मि.मी., पारनेर २ मि.मी., जामखेड २ मि.मी. वांंबोरी १२ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.
...............

Web Title: Rainfall in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.