कुही परिसरात पाऊस.. जोड

By Admin | Updated: August 13, 2015 22:34 IST2015-08-13T22:34:37+5:302015-08-13T22:34:37+5:30

कुही-पाचगाव रस्त्यावरील माळणी पूल, कुही-उमरेड मार्गावरील आमनदीचा पूल, कुही-वडोदा मार्गावरील नागनदी पूल या तिन्ही पुलांची उंची वाढविण्याची नितांत गरज आहे. सीडी वर्कच्या या तिन्ही पुलांची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात येईल, असे तहसीलदारांनी सदर प्रतिनिधींशी चर्चेदरम्यान सांगितले.

Rain in some area .. add | कुही परिसरात पाऊस.. जोड

कुही परिसरात पाऊस.. जोड

ही-पाचगाव रस्त्यावरील माळणी पूल, कुही-उमरेड मार्गावरील आमनदीचा पूल, कुही-वडोदा मार्गावरील नागनदी पूल या तिन्ही पुलांची उंची वाढविण्याची नितांत गरज आहे. सीडी वर्कच्या या तिन्ही पुलांची उंची वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात येईल, असे तहसीलदारांनी सदर प्रतिनिधींशी चर्चेदरम्यान सांगितले.
....
नाल्यावरील पुरामुळे कर्मचारी अडकले
कुही तालुक्यात गुरुवारी पहाटेपासूनच संततधार पाऊस कोसळला. माळणी गावाजवळील नाल्याच्या पुरामुळे नागपूरवरुन कुही तालुक्यात सेवा देणारे बहुतांश कर्मचारी, शिक्षक अडकून पडले होते. येथील नाल्यावरील पुरामुळे तब्बल नऊ तास वाहतूक ठप्प पडली होती. त्यामुळे तालुक्यातील कार्यालयात शुकशुकाट होता. दुपारी ३ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना पूर ओसरण्याकरिता प्रतीक्षा करावी लागली.
....
मांढळ
मुसळधार पावसामुळे परिसरातील मांढळ-वग-बाह्मणी-उमरेड, मांढळ-वीरखंडी-उमरेड, मांढळ-साळवा मार्गातील वाहतूक बंद झाली होती. आमनदी दुथडी वाहत असल्याने नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांचे शेतीपयोगी साहित्य पुरात वाहून गेले. या पावसामुळे नदीचे पाणी अनेकांच्या शेतात शिरले. त्यामुळे सोयाबीन, कपाशी, धान पीक पाण्याखाली आल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. कुही तालुक्यातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले. मांढळमधील मुख्य रस्त्यांवरील नाली पूर्णत: बुजल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहत होते. त्यामुळे रहदारीला अडसर झाला होता.

Web Title: Rain in some area .. add

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.