पाऊस.. इंट्रो
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:37+5:302015-02-11T23:19:37+5:30
जिल्ात वादळी पावसाचा फटका

पाऊस.. इंट्रो
ज ल्ह्यात वादळी पावसाचा फटकारबी पिकांचे नुकसान : काही ठिकाणी दमदार पाऊस, विद्युत पुरवठा खंडितनागपूर : जिल्ह्यातील काही तालुक्यांत बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाच्या सरी कोसळल्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही गावात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणच्या विद्युत तारा तुटल्यामुळे अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पिकांचे नुकसान वगळता जिल्ह्यात इतर कोणत्याही हानीबाबत वृत्त नाही. कळमेश्वर, भिवापूर, मौदा, उमरेड, रामटेक या तालुक्यातील अनेक गावामध्ये मंगळवारी मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास सोसाट्याच्या वादळासह पावसाला सुरुवात झाली. मौदा तालुक्यातील कोदामेंढी, खात, तारसा या परिसरात प्रचंड मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. रामटेक तालुक्यातील देवलापार, करवाही परिसरात दमदार पाऊस कोसळला. भिवापूर तालुक्यातील अनेक गावात पावासाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे मिरचीची सातरे भिजल्याने मिरची उत्पादकांचे नुकसान झाले आहे. नांद परिसरात प्रचंड वादळी पावसामुळे गहू, हरभरा, मिरची आदी पिकांचे नुकसान झाले. पारशिवनी तालुक्यात तुरळक पाऊस कोसळला. तसेच कळमेश्वर तालुक्यातील मोहपा, कन्याडोल, परसोडी, कोपर्डा या गावांमध्ये जोरदार वादळी पाऊस कोसळल्याने रबी पिकांचे नुकसान झाले. धामणा परिसरात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले. काटोल व नरखेड तालुक्यात सावरगाव, लोहारीसावंगा परिसर वगळता इतर ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या नाही.