रेल्वे 2014-15मध्ये घेणार 11,790 कोटी रुपयांचे कजर्
By Admin | Updated: July 9, 2014 01:05 IST2014-07-09T01:05:07+5:302014-07-09T01:05:07+5:30
भारतीय रेल्वे 2क्14-15 या आर्थिक वर्षात थोडे कमी कर्ज घेणार आहे.

रेल्वे 2014-15मध्ये घेणार 11,790 कोटी रुपयांचे कजर्
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे 2क्14-15 या आर्थिक वर्षात थोडे कमी कर्ज घेणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पात भांडवलासाठी आपल्या दोन कंपन्या आयआरएफसी आणि रेल्वे विकास मंडळ लिमिटेड यांच्या माध्यमातून बाजारातून 11,79क् कोटी रुपये उभे करण्यात येणार आहेत.
फेब्रुवारीत सादर झालेल्या अंतरिम रेल्वे अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षात या दोन कंपन्यांद्वारे 13,8क्क् कोटी रुपयांच्या कर्जाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, चालू आर्थिक वर्षाच्या कर्ज योजनेत 2,क्1क् कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे.
रेल्वेमंत्री, डी. व्ही. सदानंद गौडा यांनी मंगळवारी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये अंतर्गत संसाधनांशी संबंधित हिश्श्यात वाढ केली आहे. यासाठी बाजार कर्ज कमी करून 11,79क् कोटी रुपये जमविण्याचा प्रस्ताव गौडा यांनी मांडला.
रेल्वे अर्थसंकल्पात म्हटले की, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात आयआरएफसी डब्बे आणि इंजिन व प्रकल्पांत 11,5क्क् कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय भारतीय रेल्वेअंतर्गत येणारी अन्य एक वित्तीय कंपनी, रेल्वे विकास मंडळाने बाजार कर्जाच्या माध्यमातून 29क् कोटी रुपये जमविणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)