शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

Indian Railway : भारतीय रेल्वेने धावत्या गाड्यांमधून 'ही' सुविधा हटविली, जाणून घ्या काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 19:07 IST

Indian Railway : ही सुविधा प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली होती, परंतु जास्त खर्च आणि तांत्रिक कारणांमुळे ही सुविधा बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसध्या भारतीय रेल्वे देशभरातील 6000 हून अधिक स्टेशनवर वाय-फाय इंटरनेट सुविधा पुरवत आहे. रेल्वे स्टेशनवर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली :  धावत्या गाड्यांमध्ये भविष्यात भारतीय रेल्वेद्वारे (Indian Railway) उपलब्ध करून देण्यात येणारी वाय-फाय (Wi-Fi) सुविधा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाय-फायवरून चित्रपट किंवा मनोरंजनाचा आनंद घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांसाठी हा एकप्रकारे धक्का आहे. रेल्वे मंत्रालय (ministry of railways) सध्या धावत्या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा पुरवणार नाही. ही माहिती सरकारने संसदेत दिली आहे. ही सुविधा प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली होती, परंतु जास्त खर्च आणि तांत्रिक कारणांमुळे ही सुविधा बंद करण्यात आली आहे. (railways removed wi-fi internet facility from moving trains government gave information)

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात सांगितले की, मंत्रालयाने जवळपास दोन वर्षांपूर्वी सेटेलाइट कंप्‍यूनिकेशन टेक्नालॉजीद्वारे धावत्या गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा देण्याची योजना आखली होती. वाय-फाय आधारित इंटरनेट सुविधा हावडा राजधानी एक्सप्रेसमध्ये एक प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आली.

या दरम्यान ही टेक्नालॉजी अधिक महाग असल्याचे दिसून आले. त्यासाठी इंटेंसिव्ह कॅपिटलसह रेकरिंग कास्टची आवश्यकता असते. जसे की बँडविड्थ शुल्क हा प्रकल्पाला कॉस्ट इफेक्टिव्ह करत नाहीत. सध्या, धावत्या गाड्यांमध्ये वाय-फाय इंटरनेट सेवांसाठी कोणतेही योग्य आणि किफायतशीर टेक्नॉलॉजी नाही. त्यामुळे ही सुविधा तूर्तास वगळण्यात आली आहे.

6000 हून अधिक स्टेशनवर वाय-फाय इंटरनेट सेवा सुरूसध्या भारतीय रेल्वे देशभरातील 6000 हून अधिक स्टेशनवर वाय-फाय इंटरनेट सुविधा पुरवत आहे. या 6000 स्टेशनांपैकी आंध्र प्रदेशात 509, महाराष्ट्रात 550, बिहारमध्ये 384, अरुणाचल प्रदेशात 3, आसाममध्ये 222, उत्तर प्रदेशात 762, पश्चिम बंगालमध्ये 498, तामिळनाडूमध्ये 418, मध्य प्रदेशात 393, गुजरातमध्ये 320, ओडिशा 232, राजस्थान 458, कर्नाटक 335, गुजरात 320, झारखंड 217, पंजाब 146, हरियाणा 134, केरळ 120, छत्तीसगड 115, तेलंगणा 45, दिल्ली 27, हिमाचल प्रदेश 24, उत्तराखंड 24, जम्मू आणि काश्मीर 14, गोवा 20, त्रिपुरा 19, चंदीगड 5, नागालँड 3, मेघालय, मिझोराम आणि सिक्कीम 1-1 रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.

रेल्वे स्टेशनवर सुरक्षाा व्यवस्थारेल्वे स्टेशनवर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. महिला प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी, निर्भया निधी अंतर्गत 983 स्थानकांवर इंटिग्रेटेड इंक्लायरी रिस्पांस मॅनेजमेंट सिस्टिमची (IERMS) व्यवस्था सामील आहे. आतापर्यंत एकूण 814 स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेWiFiवायफायbusinessव्यवसायInternetइंटरनेट