शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचं मिशन 100; प्रवासासाठी लागणारा वेळ कमी करणं लक्ष्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 10:53 IST

रेल्वेकडून या योजनेचा प्रस्ताव मिशन 100 दिवस अंतर्गत आर्थिक बाबींच्या पूर्ततेसाठी कॅबिनेटसमोर मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे.

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे पुढील चार वर्षाच्या कालावधीत देशाच्या राजधानीला आर्थिक राजधानी मुंबईला आणि हावडा स्टेशनला आणखी जवळ आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या दोन्ही प्रवासातील अंतर जवळपास प्रत्येकी 5 तासाने कमी करण्याचं उद्दिष्ट रेल्वेने बनवलं आहे. त्यासाठी 14 हजार कोटी रुपये खर्च करुन या दोन्ही रेल्वेमार्गाला आधुनिक बनविण्याचं काम हाती घेतलं आहे. 

रेल्वेकडून या योजनेचा प्रस्ताव मिशन 100 दिवस अंतर्गत आर्थिक बाबींच्या पूर्ततेसाठी कॅबिनेटसमोर मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाची औपचारिकता 31 ऑगस्ट 2019 पर्यंत पूर्ण करुन काम सुरु करण्याची योजना आहे. दिल्ली हावडा आणि दिल्ली मुंबई रेल्वे मार्ग प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी रेल्वेने या मार्गावरील चालणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनची गती वाढवून 160 किमी प्रतितास करण्याचं ठरवलं आहे. यासाठी दोन्ही रेल्वेमार्गावरील रेल्वे ट्रॅकचं दुरुस्तीकरण आणि काही जागांवर आवश्यकता असेल तिथे बदल करण्याचं सुचवलं आहे. 

प्रस्तावाच्या अनुसरुन दिल्ली हावडामध्ये 1525 किलोमीटर लांब ट्रॅकसाठी 6 हजार 684 कोटी रुपये तर दिल्ली मुंबईमध्ये 1483 किलोमीटरसाठी 6 हजार 806 कोटी रुपये खर्च होतील असा प्रस्ताव तयार केला आहे. 

काय असेल विशेष? 

  •  देशातील 30 टक्के रेल्वे प्रवासी या दोन रेल्वेमार्गावर प्रवास करतात
  • 20 टक्के उत्पन्न या दोन रेल्वेमार्गावरील प्रवासामुळे मिळतं. 
  • दिल्ली-हावडा प्रवास करण्यासाठी 17 तासांचा अवधी लागतो. 
  • दिल्ली-मुंबई या प्रवासासाठी 15.5 तासाचा अवधी लागतो. 
  • या दोन्ही रेल्वेमार्गावरील प्रवासाचा वेळ कमी करुन प्रत्येकी 12 तास आणि 10 तास करायचे आहे. 
  • यासाठी प्रतितास 160 किमी वेगाने रेल्वे धावल्या जातील 
  • सध्या या मार्गावर 130 किमी प्रतितास वेगाने ट्रेन धावत आहेत. 

 

मिशन 100 दिवसमध्ये आहे काय?

  • तिकीटावर मिळणार सब्सिडी सोडण्यासाठी गिव इट अप अभियान रेल्वेकडून राबविण्यात येणार 
  • महत्वाच्या पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या दोन ट्रेनची जबाबदारी स्थानिक प्राधिकरणावर देणार 
  • रेल्वे दुर्घटना रोखण्यासाठी रेल्वे रुळ डिजिटल कॉरिडोरमध्ये बदलणार 
  • देशातील 4 हजार 882 रेल्वे स्थानकावर वाय-फाय बसवणार 
  • 2023 पर्यंत देशातील 2 हजार 568 रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यासाठी सरकारकडे 50 कोटींची मागणी 
  • 50 रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासोबत रेल्वे बोर्डाचं पुनर्गठन करणार
  • रेल्वे सिग्नल सिस्टीम आणि अन्य तांत्रिक समस्यांना तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणणार 
टॅग्स :railwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीMumbaiमुंबईdelhiदिल्ली