रेल्वे कर्मचा:यांना 78 दिवसांच्या पगाराइतका बोनस
By Admin | Updated: October 19, 2014 01:27 IST2014-10-19T01:27:00+5:302014-10-19T01:27:00+5:30
रेल्वेच्या साडेबारा लाखांपेक्षा अधिक कर्मचा:यांना दिवाळीची भेट म्हणून 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आह़े

रेल्वे कर्मचा:यांना 78 दिवसांच्या पगाराइतका बोनस
नवी दिल्ली : रेल्वेच्या साडेबारा लाखांपेक्षा अधिक कर्मचा:यांना दिवाळीची भेट म्हणून 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आह़े
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा निर्णय जाहीर केला़ 2क्13-14 आर्थिक वर्षात उत्पादकतेच्या आधारावरील या बोनस अंतर्गत सरकारला रेल्वेच्या सुमारे 12 लाख 6क् हजार बिगर राजपत्रित कर्मचा:यांना सुमारे 1क्63़38 कोटी रुपयांचे वाटप करावे लागेल़
बोनस देयक अधिनियम 1965 अंतर्गत दिल्या जाणा:या बोनस रकमेची जास्तीजास्त सीमा 35क्क् प्रति माह असेल़ रेल्वे कर्मचा:यांना हा बोनस आधीच वाटप करण्यात आला आह़े पंतप्रधानांची व्यस्तता आणि अरुण जेटली यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव या बोनसला वेळेत मंत्रिमंडळाची मंजुरी मिळू शकली नव्हती़ (प्रतिनिधी)