शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
2
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
3
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
4
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
5
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
6
क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा
7
हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी
8
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
9
Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
10
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता 
11
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
12
रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा
13
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
14
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
15
बँक फसवणुकीचा आरोपी व्यावसायिक बनून होता लपून, नऊ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या 
16
ट्रम्पना इतर देशांवर टॅरिफ आकारण्याचा अधिकार नाही
17
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
18
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
19
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
20
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट

रेल्वेच्या किचनमध्ये कसं तयार होतं जेवण; आता प्रवाशांना दिसणार LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 11:08 IST

रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थ्यांच्या जेवणाच्या दर्जाबद्दल कायम साशंकता असते

नवी दिल्ली: रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबद्दल प्रवाशांच्या मनात कायम साशंकता असते. रेल्वेत मिळणारं जेवण कसं तयार केलं जातं, ते तयार करताना स्वच्छता राखली जाते का, असे अनेक प्रश्न प्रवाशांच्या मनात असतात. त्यामुळे बहुतांश प्रवासी रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थ टाळतात. त्यामुळे आता आयआरसीटीसीनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आयआरसीटीसीनं लाईव्ह स्ट्रिमिंग मॅकेनिजम विकसित केलं आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये दिलं जाणारं जेवण नेमकं कसं तयार केलं जाते आहे, हे प्रवाशांना पाहता येणार आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत याबद्दलची सूचना केली होती. यानंतर काल रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी काल आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील लाईव्ह स्ट्रिमिंग सेवेचं उद्घाटन केलं. यामुळे आयआरसीटीसीकडून तयार केल्या जाणाऱ्या जेवणाचं किचनमधून लाईव्ह स्ट्रिमिंग होईल. आपल्याला मिळणारं जेवण कसं तयार केलं जातं, ते तयार करताना आसपास स्वच्छता असते का, हे पाहणं यामुळे प्रवाशांना शक्य होईल. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरील गॅलरी सेक्शनमध्ये या व्हिडीओंची लिंक शेयर केली जाईल. यामुळे खाद्यपदार्थ नेमके कसे तयार केले गेले, हे प्रवाशांना अगदी सहज पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच आयआरसीटीसीनं नवीन वेबसाईट सुरू केली. या माध्यमातून प्रवाशांच्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न रेल्वेनं केला आहे. प्रवाशांना अनेक गोष्टी सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशानं ही नवी वेबसाईट तयार करण्यात आली. लाईव्ह स्ट्रिमिंगची सुविधा सुरू करण्यापूर्वी अश्विनी लोहानी यांनी आयआरसीटीसीच्या नोएडातील एका किचनची पाहाणी केली होती. या किचनमधून राजधानीच्या 17 गाड्यांसह शताब्दी आणि दुरांतो गाड्यांना खाद्यपदार्थ पुरवले जातात.  

टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीrailwayरेल्वेfoodअन्नIndian Railwayभारतीय रेल्वे