रेल्वेचे खासगीकरण नाही

By Admin | Updated: December 26, 2014 01:42 IST2014-12-26T01:42:57+5:302014-12-26T01:42:57+5:30

रेल्वे खासगीकरणाची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावली आहे़ रेल्वेचे खासगीकरण करणार नाही़ याबाबतचे तर्कवितर्क निरर्थक व निराधार आहेत, अशी स्पष्टोक्ती मोदींनी दिली आहे़

Railway is not privatized | रेल्वेचे खासगीकरण नाही

रेल्वेचे खासगीकरण नाही

वाराणसी : रेल्वे खासगीकरणाची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावली आहे़ रेल्वेचे खासगीकरण करणार नाही़ याबाबतचे तर्कवितर्क निरर्थक व निराधार आहेत, अशी स्पष्टोक्ती मोदींनी दिली आहे़
गुरुवारी वाराणसी या आपल्या मतदारसंघात मोदींच्या हस्ते रेल्वे वर्कशॉप विस्तारीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते़ रेल्वे खासगीकरणाला रेल्वे युनियनकडून विरोध सुरू आहे़ या पार्श्वभूमीवर मोदींची स्पष्टोक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे़
भारतीय रेल्वेतील पायाभूत सुधारणांसाठी विदेशी व खासगी गुंतवणुकीमुळे काळजी करण्याचे कारण नाही़ यामुळे केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे़ रेल्वेचे खासगीकरण केले जाईल, ही धारणा चुकीची आहे़ सरकारचे असे कोणतेही प्रयत्न नाहीत़ रेल्वे खासगीकरणाच्या दिशेने कुठलेही प्रयत्न चाललेले नाहीत, अशी कुठलीही आमची इच्छा नाही आणि तसे आमचे धोरणही नाही़ त्यामुळे रेल्वे युनियननी चिंता करण्याची गरज नाही, असे मोदी म्हणाले़ बालपणी मोदी एका रेल्वेस्थानकाजवळ चहा विकत़ त्या दिवसांना आठवत मोदी म्हणाले की, माझे आणि रेल्वेचे जवळचे नाते आहे़ माझे आयुष्यच रेल्वेतून घडले आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Railway is not privatized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.