शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना वक्तव्य भोवले; रेल्वे युनियनकडून धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 8:55 PM

रेल्वे मंत्री गोयल एका रेल्वे स्टेडिअममध्ये कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आले होते.

लखनऊ : लखनऊच्या एका कार्यक्रमाला आलेल्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना रेल्वे कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की करत माघारी पाठविले. शिव्या आणि धक्काबुक्कीमुळे कार्यक्रमामध्ये गोंधळ माजला होता. गोयल यांच्या कार्यालयाकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे.

रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे संघटना कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी गोयल यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. यानंतर जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ घालण्यास सुरुवात झाली. यादरम्यान गोयल यांच्यावर एका कर्मचाऱ्याने कुंडी भिरकावली. यामुळे त्यांना छोटी जखमही झाली. काही वेळ ते डोके धरून होते. यामध्ये सुरक्षारक्षक पंकज शुक्ला हे देखील जखमी झाले.

रेल्वे मंत्री गोयल एका रेल्वे स्टेडिअममध्ये कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आले होते. मात्र, भाषणावेळी त्यांनी रेल्वे युनियनबाबत वक्तव्य केल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना घेरले आणि धक्काबुक्की केली. युनियन कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहे. तरुणांना चुकीच्या रस्त्यावर नेत आहे.  यानंतर तेथे गोंधळ झाला. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू केली. धक्काबुक्कीत गोयल यांनाही मारहाण झाल्याचे समजते. यानंतर गोयल यांना तेथून हाकलून देण्यात आले. फोटोंमध्ये गोयल पळताना दिसत आहेत.

दरम्यान, गोयल यांच्या कार्यालयाकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले असून अशाप्रकारची कोणतीही घटना घडल्याचे किंवा गोयल यांना मारहाण झाली नसल्याचे म्हटले आहे.

 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpiyush goyalपीयुष गोयलCrime Newsगुन्हेगारी