शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील व्हीआयपी  संस्कृतीवर रेल्वेमंत्र्यांचा प्रहार, कर्मचाऱ्यांकडून घरगुती कामे करून घेऊ शकणार नाहीत अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 16:13 IST

रेल्वे खात्यामध्ये वर्षांनुवर्षे चालत आलेल्या व्हीआयपी संस्कृतीवर  रेल्वेमंत्रालयाने प्रहार केला आहे. रेल्वेमधील अधिकाऱ्यांना आपल्या घरी आणि कार्यालयात मेहनत करण्याचा सल्ला रेल्वे मंत्रालयाने दिला आहे.

नवी दिल्ली - रेल्वे खात्यामध्ये वर्षांनुवर्षे चालत आलेल्या व्हीआयपी संस्कृतीवर  रेल्वेमंत्रालयाने प्रहार केला आहे. रेल्वेमधील अधिकाऱ्यांना आपल्या घरी आणि कार्यालयात मेहनत करण्याचा सल्ला रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. यापुढे रेल्वेमधील कर्मचाऱ्यांकडून घरकाम करून घेणे तात्काळ बंद करा, असे स्पष्ट आदेश रेल्वे मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याबरोबरच तसेच रेल्वे मंत्रालयाने आपला 36 वर्षांपासून चालत आलेला एक प्रोटोकॉलही मोडीत काढला आहे. ज्यानुसार रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि बोर्ड मेंबर्सच्या विभागीय दौऱ्यांदरम्यान महाव्यस्थापकांना त्यांचे स्वागत आणि निरोपासाठी उपस्थित राहावे लागत असे. रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात फेरबदल करताना रेल्वे बोर्डाने 1981 च्या त्या आदेशांना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यानुसार रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हे प्रोटोकॉल निश्चित करण्यात आले होते. 28 सप्टेंबर रोजी रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या आदेशांमध्ये  रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि अन्य अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर उपस्थित राहण्याच्या प्रोटोकॉल संदर्भातील मार्गदर्शक तत्त्व तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले. त्याबरोबरच  रेल्वेचा कुठलाही अधिकारी बुके किंवा भेटवस्तू स्वीकारणार नाही, असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहानी यांनी सांगितले. रेल्वेचे सुमारे 30 हजार ट्रॅकमन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी काम करत आहेत. त्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच अधिकाऱ्यांनी घरगुती कामांसाठी ठेवलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामातून मुक्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या आदेशानंतर गेल्या महिनाभरात सुमारे 6 ते 7 हजार कर्मचारी कामावर परतले आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.   रेल्वेमधील व्हीआयपी संस्कृती संपवण्याबाबत माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,"अत्यंत खास परिस्थिती वगळता कुणालाही सुट देण्यात येणार नाही. सर्व कर्मचारी लवकरच कामावर परततील अशी अपेक्षा आहे." रेल्वे अधिकाऱ्यांनी आरामदारीय एक्झिक्युटिव्ह श्रेणी सोडून एसी-3 आणि स्लीपरमधून प्रवास करावा, असे आवाहनही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतGovernmentसरकार